शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक; शिंदे-अजित पवार गट भाजपला नाचवणार

By अजित मांडके | Published: October 13, 2023 7:03 AM

लोकसभा मागाल, तर पदवीधर लढण्याचा शिंदे गटाचा इशारा...

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा गड असताना शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने निवडणूक रिंगणात उडी मारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. भाजपबरोबरच सत्तेतील मित्रपक्षांनी मतदार नोंदणी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे भाजपमध्ये काहीशी अस्वस्थता आहे. शिवसेनेच्या बैठकीत कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवावी, अशी मागणी काही पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे केली. ठाण्यात भाजप-शिवसेनेत सख्य नाही पण शिंदे व अजित पवार गटात मधूर संबंध असल्याने भाजपला नाचविण्याची संधी दोन्ही पक्षांचे नेते सोडणार नाहीत. 

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला अद्याप काही कालावधी असला, तरी आतापासून ठाण्यात निवडणुकीची रंगत वाढत  आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने ठाण्यात बैठक घेतली. दोनच दिवसांपूर्वी शिवसेनेने मतदार नोंदणीबाबत बैठक घेतली. या बैठकीत भाजपकडून जी वागणूक मिळत आहे, ती पाहता कोकण पदवीधर निवडणूक आपण लढवावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी वरिष्ठांकडे केल्याची माहिती आहे. 

मागील निवडणुकीत पराभूत झालेले राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी मतदार नोंदणीला सुरूवात केली आहे. अजित पवार गटात असलेले मुल्ला निवडणूक लढणार किंवा नाही, याबाबत तूर्त स्पष्टता नसली तरी त्यांनी नव्याने केलेली मतदार नोंदणी ही शिवसेनेच्या फायद्याची ठरणार आहे. ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत फारसे सख्य नाही. मागील निवडणुकीत मुल्ला यांना १४ हजार मते मिळाली होती. त्यामुळे भविष्यात भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीला निवडणूक लढविण्यापासून परावृत्त केले तरी निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या नाकदुऱ्या भाजपला काढाव्या लागतील.

शरद पवार गटाचा उमेदवार निश्चित?मागील निवडणुकीप्रमाणे राष्ट्रवादीचा शरद पवार गट  मैदानात उतरला आहे. त्यांच्याकडून मतदार नोंदणीसाठी सर्व तयारी सुरू झाल्याची माहिती आहे. शरद पवार गटाचा संभाव्य उमेदवार निश्चित झाला आहे. त्यामुळे वरकरणी एकतर्फी वाटणारी कोकण पदवीधर निवडणूक चुरशीची होण्याची चर्चा आहे.

शिवसेनेचा गड सोडण्यास नकारभाजपकडून ठाणे आणि कल्याण लोकसभेवर दावा केला जात आहे. पण शिवसेना हा गड सोडण्यास तयार नाही. परंतु, भाजप आपला दावा भक्कम असल्याचे सांगत आहे. भाजप लोकसभा मतदारसंघ मागत असेल तर आम्ही कोकण पदवीधर का मागू नये? असा सवाल शिवसेनेतील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेElectionनिवडणूक