ठाणे : १ मे १०१८ रोजी शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्व च्या ५१व्या वर्धापनदिना निमित्त स्वरसंध्या ही मराठी हिंदी अजरामर गाण्यांची मैफल आयोजित केली होती. यात प्रशांत काळूनद्रेकर, मेघना काळूनद्रेकर, राजेंद्र गायकवाड आणि नेहा नाईक यांनी एकापेक्षा एक अजरामर आणि सुरमयी गाण्यांची मेजवानी उपस्थित रसिक प्रेक्षकांना पेश केली.
या मैफलीचे सुत्रसंचलन मयुरेश साने यांनी त्यांच्या काव्यात्मक खुमासदार शैलीत पेश करून रसिकांची वाहवा मिळवली. या मैफिलची सुरवात शिवकल्याण राजा या शिवस्तवनांनी झाली. त्यांनतर तुझे गीत गाण्यासाठी, सांज ये गोकुळीं, सूर तोच छेडीता, वारा गाई गाणे, स्वर आले दुरुनी, फुलले रे क्षण माझे, काटा रुते कोणाला, पल पल दिलके पास, कौन आया मेरे मनके द्वारे,काटो से खिचके ये आचल, ओ मेरे सोना रे सोना रे, चुरा लिया है, वादा करलो साजणा, ये शाम मस्तानी,विकत घेतला श्याम, योयो पाहुणा सखूचा मेव्हणा, छबिदार छबी मी, लागली कोणाची उचकी, लटपट लटपट तुझं चालणं, हसता हुवा नूरानी चेहरा, एक लाजरंन साजरा मुखडा, शूर आम्ही सरदार आम्हला, म्यांनातून उसळे तलवारीची, जय जय महाराष्ट्र माझा अशी अनेक गाणी सादर झाली. या मैफलीचा शेवट आंनदमठ चित्रपटातल्या विर रसातील *वंदे मातरम* या गीताने झाली. कार्यक्रमाचे संचालन गौतम नाईक यांनी केले, या वेळी राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू *मनीषा डांगे*, यांना त्यांच्या बास्केटबॉल खेळातील प्रविण्याबद्दल महाराष्ट्र सरकार ने २०१६-१७ श्री शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याबद्दल त्यांचा, ज्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे, आणि हल्लीच गोवा-बंगलोर- मुंबई हा १००० किलोमीटर चा प्रवास सायकली ने विश्वविक्रमी वेळेत पूर्ण करणारा व २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याची जिद्द बाळगणाऱ्या *रवी आवारी* आणि आताच झालेल्या राष्ट्रीय खोखो स्पर्धेत वीर अभिमन्यू हा मानचा पुरस्कार मिळवणारा *शुभम उतेकर* या ठाणे पूर्ववासीयांचा मंडळा तर्फे यथोचित सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमत अनेक मान्यवरांची उपस्थिती होतो, या कार्यक्रमाचे नियोजन शिवसेना कोपरी विभागप्रमुख व मंडळाचे सल्लागार गिरीश राजे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे अध्यक्ष अजय नाईक यांनी केले.