कल्याण : पश्चिमेतील मौलवी कम्पाउंडसमोरील आसरा फाउंडेशन संचालित काळसेकर शाळेत २०० खाटांची क्षमता असलेले कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बुधवारी सायंकाळी या सेंटरची पाहणी केली.आसरा फाउंडेशनने स्वत:हून पुढाकार घेऊन शाळेत कोविड सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न केले आहेत. या सेंटरमध्ये तापाच्या रुग्णांची तपासणी, अॅण्टीजेन टेस्ट केली जाणार आहे.
कोविड सेंटर व रुग्णालय येथे सुरू केले जाणार आहे. त्यात ११० खाटा आॅक्सिजनयुक्त, १० खाटा आयसीयूयुक्त, तर ७० खाटा विलगीकरणासाठी असणार आहेत. या परिसरातील १२ डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांनी कोविड रुग्णालयास सेवा देण्यास तयारी दर्शविली आहे.