ठाणे: व्यास क्रिएशन्सच्या वतीने दरवर्षी देण्यात येतो. यंदा ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर यांना कृतार्थ जीवन सन्मान पुरस्काराने तर सुरेंद्र दिघे व सुमिता दिघे या दाम्पत्यांना सेवा रत्न दांपत्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्यास क्रि एशन्सतर्फे मंगळवारी गडकरी रंगायतने येथे सतरावा ज्येष्ठ महोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी खास ज्येष्ठांसाठी ‘ज्येष्ठविश्व’ मासिकाच्या पहिल्या अंकाचे व महिला दिनानिमित्त ‘तेजिस्वनी’ विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कार्यक्र माला प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, नाट्य सिने अभिनत्री प्रतिक्षा लोणकर, अभिनेत्री वर्षा धांदळे आणि ज्येष्ठ रंगकर्मी रागिणी सामंत, तेजिस्वनी अंकाच्या अतिथी संपादिका, आकाशवाणी अस्मिता वाहिनीच्या कार्यक्र म प्रमुख उमा दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, वैद्य सुचित्रा कुलकर्णी, ज्येष्ठ समीक्षक श्रीराम बोरकर, ज्येष्ठ नाटककार शशिकांत कोनकर, फेसकॉमचे अध्यक्ष द. तु. चौधरी, मधुकरराव कुलकर्णी, उद्योजिका तनुजा चौधरी, व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र बेडेकर यांनी केले. सुधा चाफेकर. सदाशिव कुलकर्णी, प्रतिभा कुलकर्णी, अरविंद सोनावणे, सुधा शिधये, प्रकाश दिघे, डॉ. श्रीकांत होटे व भास्कर भांड यांना सेवा रत्न तर साधना रसाळ, यशवंत पाटील, जयश्री आंबीकर, जयंत भावे, मुरलीधर परुळेकर, अंतोन पेदू, प्रदीप केळकर, चंद्रकांत पाटील, प्रमोद भोपी यांना ज्येष्ठ रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्या कार्यक्रमाची सुरूवात शास्त्रीय संगीताने होते तो कार्यक्रम नक्कीच यशस्वी होतो. संगीतात सगळीच व्हिटॅमिन्स आहेत. चांगले संगीत ऐका असे आण्ही गर्भवती स्त्रीयांना सांगतो आणि त्याचा नक्कीच परिणाम होतो. जेव्हा दोन पायांनी चालतो तेव्हा तो प्रवास असतो आणि दोन पायांचा प्रवास हृदय ओतून करतो तेव्हा ती यात्रा असते अशा शब्दांत डॉ. देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.