ठाणे : अभिनय कट्टा क्रमांक ४२३ वर साजरा झाला अक्कलकोट निवासी कृपासिंधू स्वामी समर्थ ह्यांच्या प्रकटदिन. अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी नाट्याविष्कारातून साकारला स्वामींचा जीवन प्रवास.
चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजे दत्तावतारी स्वामी समर्थांचा प्रकट दिवस. दत्ताचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती ह्यांनी शैल्य पर्वतावर समाधी घेतली. त्या निर्मनुष्य अरण्यात त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी वारूळ रचले. एके दिवशी एक लाकूड तोड्या शैल्यपर्वती आला त्याच्या हातून कुर्हाड निसटून ती वारुळावर पडली आणि त्या वारुळातून स्वामी समर्थ प्रकटले.त्यानंतर सर्व गुरुरूपी राहून स्वामींनी अनेकांचे दुःख दूर केली.मार्ग भरकटलेल्या अनेकांना योग्य मार्ग दाखवला.अध्यात्म, परमार्थ ,आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावर कसे वागावे,माणसाच्या उद्धारासाठी ईश्वर आहे परंतु स्वतःचे कर्तृत्व तितकंच महत्वाचं आहे.स्वामींचा जीवन प्रवास म्हणजे आयुष्याचा अर्थ उलगडणारा एक अर्थपूर्ण अध्याय. हा स्वामींच्या आयुष्यातील प्रकटदिन ते समाधी ह्या प्रवासातील महत्वाच्या प्रसंगाचा नाट्याविष्कार अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी सादर केला.स्वामींचे वारुळातून प्रकट होणे, त्यानंतर स्वामींचे शिष्य बसाप्पा,चिंतोपंत,हरिभाऊ,चोळप्पा,सुंदराबाई ,बाळाप्पा अश्यांचे स्वामींच्या प्रवासातील स्थान त्यांच्यामार्फत स्वामींनी जगाला दिलेला जाईवनाचा संदेश ह्याचे नाट्यमय सादरीकरण कट्ट्याचे कलाकारांनी स्वामींमय वातावरणात सादर केले.
सादर सादरीकरण अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पेनेतून आणि अभिनय कट्ट्याचा कलाकार परेश दळवी ह्याच्या दिग्दर्शनातून साकार झाले. सदर सादरीकरणात शनी जाधव .अतिश जगताप, महेश झिरपे,सहदेव साळकर,साक्षी महाडिक ,सहदेव कोळंबकर,विजया साळुंके ,ओंकार मराठे, कुंदन भोसले, विद्या पवार, शुभांगी भालेकर,रुक्मिणी कदम,न्यूतन लंके,अभय पवार,अमोघ डाके चिन्मय मौर्ये,श्रेयस साळुंखे, अस्मि शिंदे,रुचिता भालेराव ह्या अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी सहभाग घेतला.सादर सादरीकरणात स्वामींची भूमिका अभिनय कट्ट्याचे कलाकार राजन मयेकर ह्यांनी साकारली. सदर कार्यक्रमात दिव्यांग कला केंद्राच्या मुलांनी 'स्वामी समर्थ माझे आई' ह्या गीतावर नृत्य सादर केले. सदर सादरीकरणात पार्थ खड्कबान,भूषण गुप्ते,विजय जोशी,अविनाश मुंगसे ,संकेत भोसले,गौरव राणे, अन्मय मैत्रे , गौरव जोशी, निशांत गोखले, आरती गोडबोले, अपूर्वा दुर्गुळे, दीपा काजळे, जान्हवी कदम, रेश्मा जेठरा ह्यांनी सहभाग घेतला. सादर सादरीकरणाला संध्या नाकती आणि परेश दळवी ह्यांचे मार्गदर्शन लाभले. अभिनय कट्टा आणि दिव्यांग कला केंद्रातील कलाकारांच्या सादरीकरणाने अभिनय कट्ट्याचे वातावरण स्वामीमय झाले होते. *आपल्या आयुष्यात आपल्या क्षेत्रात गुरुचे स्थान महत्वाचे असते.गुरुचे अस्तित्व आपल्याला अनेक अडचणींना समस्यांना तोंड देण्याचे बळ देते.स्वामींचे स्थान अनेकांच्या आयुष्यात गुरुस्थानी आहेत.अनेकांना स्वामींचं अस्तित्व त्यांच्या अडचणीच्या सुखाच्या काळात अनुभवायला मिळते.आज स्वामींचा प्रकटदिन स्वामींच्या चरणी कलाविष्कारातून सुमने वाहण्याचा एक प्रामाणिक विचार मनात आला आणि त्यातूनच 'कृपासिंधू' हा कार्यक्रम सादर झाला.प्रत्येकाने आयुष्यात चांगल्या विचारांचा अवलंब करून त्यांच्या क्षेत्रात यशस्वी असणाऱ्या व्यक्तीला आपण गुरुस्थानी मानावे आणि आयुष्याचा खरा अर्थ जाणून घ्यावा असे मत किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्यासोबतच उपस्थितांपैकी अनेकांनी स्वामींविषयीचे त्यांचे अनुभव सांगितले.सादर कार्यक्रमाचे निवेदन किरण नाकती ह्यांनी केले.