- प्रशांत माने कल्याण : बंदी असलेल्या शस्त्रांची विक्री करणाऱ्या धनंजय अनंत कुलकर्णी याचे बिंग खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या माध्यमातून फोडण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले असले, तरी तोतया ग्राहकास दोन तलवारींची केलेली विक्री कुलकर्णीच्या अंगाशी आल्याची माहिती उघडकीस आली आहे. मराठा तलवारीच्या विक्रीने कुलकर्णीच्या बेकायदा शस्त्रसाठ्याचा पर्दाफाश केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मानपाडा रोड परिसरातील तपस्या हाउस आॅफ फॅशन नावाच्या दुकानात शस्त्रांचा साठा आणि त्यांची विक्री करणाºया कुलकर्णीला सोमवारी कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. कुलकर्णी हा डोंबिवली भाजपा पूर्व मंडळ उपाध्यक्ष तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता असल्याने या प्रकरणात राजकीय दबावतंत्राचा पुरेपूर वापर झाल्याचीही चर्चा आहे.पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात चॉपर, तलवारी, कुकरी, गुप्ती, सुरे, कुºहाडी, कोयता, एअरगन, बटणचाकू, फायटर असा एक लाख ८६ हजार रुपयांचा तब्बल १७० शस्त्रांचा दडवलेला साठा मिळाल्याने कुलकर्णीला पोलीस कोठडी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु, न्यायालयीन कोठडी मिळाल्याने कुलकर्णीने शस्त्रे कुठून आणली, आतापर्यंत कोणाकोणाला विकली, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीतच राहिली. फॅशन शॉपमध्ये सर्रासपणे अशा वस्तू मिळत असल्याचे बोलले जात असले, तरी ही शस्त्रे दडवण्यामागचे कारण काय, असा सवालही उपस्थित होत आहे. ही शस्त्रे पंजाब आणि राजस्थानमधून आणण्यात आली आहेत. कुलकर्णी हा शस्त्रविक्रीचा व्यवसाय दोन ते तीन वर्षांपासून करत होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याचा बेकायदेशीर शस्त्रसाठाविक्रीचा भंडाफोड केला असला, तरी एवढी वर्षे सुरू असलेल्या शस्त्रास्त्रविक्रीबाबत स्थानिक टिळकनगर पोलीस अनभिज्ञ होते. हेदेखील विसरून चालणार नाही.दरम्यान, खबºयाकडून मिळालेल्या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तोतया गिºहाईक पाठवून बेकायदेशीर शस्त्रसाठ्याची विक्री सुरू असल्याची खात्री करून घेतली होती. चार ते पाच दिवसांपूर्वीच खबºयामार्फत पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती. पोलिसांनी पाठवलेल्या गिºहाइकामार्फत प्रारंभी छोट्या आकाराची तलवार खरेदी करण्यात आली; परंतु भक्कम पुराव्यासाठी मोठ्या शस्त्राची मागणी पोलिसांच्या ग्राहकाने केली. त्यावेळी पाच हजार ५०० रुपयांची मराठा तलवार कुलकर्णीने तोतया गिºहाइकाला दाखवली. त्यानंतर, पोलिसांनी धाड टाकली व पर्दाफाश केला.>पोलीस कोठडीचाआज फैसलाकुलकर्णीला पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी आमच्याकडून करण्यात आली होती. सध्या कुलकर्णी न्यायालयीन कोठडीत असला तरी, त्याच्या पोलीस कोठडीसाठी गुन्हे शाखेने पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी सांगितले.
‘मराठा तलवारी’ने केला कुलकर्णीचा पर्दाफाश!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 1:02 AM