शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

रस्ते, पाणी, साफसफाई आदी मूलभूत गरजेची वानवा; उल्हासनगरचा ७२ वा वर्धापन दिवस, मात्र समस्या जैसे थे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 4:54 PM

८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत आहे. अनेक मूलभूत समस्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त.

ठळक मुद्दे८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत आहे.अनेक मूलभूत समस्यांमुळे नागरिक झालेत त्रस्त.

सदानंद नाईक उल्हासनगर : ८ ऑगस्ट रोजी शहराचा ७२ व्या वर्धापन दिन साजरा होत असतांना दुसरीकडे पाणी टंचाई, साफसफाई, रस्ते, आरोग्य आदी मूलभूत समस्याने नागरिक त्रस्त आहेत. शहरातील अनाधिकृत व धोकादायक इमारतींचा प्रश्न उभा ठाकला असून महापालिकेच्या बहुतांश विभागात सावळागोंधळ उडून आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. फाळणीवेळी पाकिस्तान मधील सिंध प्रांतातून सिंधी समाजसह अन्य समाजाच्या नागरिकांनी भारतात येणे पसंत केले. विस्थापित झालेल्या पैकी ९५ हजारा पेक्षा जास्त नागरिकांना कल्याण शहारा जवळींल लष्करी छावणीतील बेरेक, खुली जागा आदी ठिकाणावर वसविण्यात आले. भारताचे पहिले गव्हर्नर सी राजगोपालचारी यांनी शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदी वरून विस्थापित वस्तीला उल्हासनगर नाव दिलं. मात्र अनेक सिंधी बांधवानी उल्हासनगर ऐवजी सिंधूनगर नाव देण्याची मागणी त्यावेळी केली होती. मात्र फाळणीच्या कटू आठवणी नको म्हणून उल्हासनगर नाव देण्यात आले. 

अतिशय काटक, उधोगप्रिय असलेल्या सिंधी बांधवानी शहराचे नाव राज्य, देश नव्हेतर जगावर छाप टाकली. सिंधी समाजाच्या नागरिकांनी बांधकाम व्यावसायिक, सिनेमा क्षेत्र, उधोग, हॉटेल, कपडे, फर्निचर आदी अनेक क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमठविला. मात्र शहर विकास नावाला होऊन हजारो नागरिकांचा जीव धोकादायक व अनाधिकृत इमारातीमुळे टांगणीला लागला. देशात सिमेंट रस्त्याची सुरुवात शहरातून झाली असून शहरातील सिमेंट रस्ते डोळ्यासमोर ठेवून, इतर शहरे व देश सिमेंट रस्ते बांधत आहेत. तर शहरात खराब झालेल्या सिमेंट रस्त्यावर सिमेंट रस्ते बांधले जात आहे. एकूणच रस्त्याची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईचीही समस्या उभी ठाकली आहे. तर महापालिकेच्या बहुतांश विभागात सावळा गोंधळ उडाला असून महापालिका कारभारावर टीकेची झोड उठली आहे. एकूणच ७२ वर्षानंतरही शहर बकाल व समस्यांचा पाऊस पडत आहे.

महापालिका कारभारात हवी पारदर्शकता अवघे साडे १३ कि.मी. च्या क्षेत्रफळाच्या शहरात ९ लाखा पेक्षा जास्त लोकसंख्या दाटीवाटीने राहत आहे. देशातील सर्वाधिक घनता शहराची असून शहराची हद्द वाढविण्याची मागणी वारंवार शासनाकडे होत आहे. तसेच महापालिकेचा पारदर्शक नसल्याने, शहरात समस्यांचा पाऊस पडला. यावेळी शहर विकासाचे व विभागातील गोंधळाचे खापर पालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्यावर फोडण्यात येत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणीbusinessव्यवसाय