शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

खर्चाबाबत तक्रारींचा अभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2019 2:28 AM

जिल्ह्यात तीन निवडणूक खर्च निरीक्षक : पाच दिवसांत एकही तक्रार नाही

- सुरेश लोखंडे

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघांमधील उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन खर्च निरीक्षक जिल्ह्यात नेमले आहेत. त्यांची कार्यालयेही ठिकठिकाणी सुरू झाली आहेत. त्या ठिकाणी किंवा भ्रमणध्वनीवर नागरिकांना अनावश्यक खर्चाच्या तक्रारी करण्याची मुभा आहे. मात्र, पाच दिवसांत या तिन्ही निरीक्षकांकडे नागरिकांकडून एकही तक्रार आली नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पथकांच्या निरीक्षकांची नियुक्ती जिल्ह्यात करण्यात आली आहे. यामध्ये सर्वसाधारण निरीक्षक, खर्च निरीक्षक, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक नियुक्त केले आहेत. या प्रत्येकावर दोन मतदारसंघांची जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच स्वीप निरीक्षक हे लोकसभा मतदारसंघनिहाय तैनात राहणार आहेत. याप्रमाणेच जिल्ह्यात सद्य:स्थितीला तैनात असलेल्या पथकांकडून अवैध दारू, आचारसंहितेचा भंग करण्याऱ्या घटनांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. याशिवाय, बँकेतून काढण्यात येणाऱ्या मोठ्या रकमांसह अन्यत्र नेण्यात येणाºया रकमांना खर्च निरीक्षकांच्या नजरा टिपत आहेत. यासाठी अद्याप नागरिकांकडून खास तक्रारी आलेल्या नाहीत. पण, ठिकठिकाणी आलेल्या संशयावरून जिल्ह्यात या खर्च निरीक्षकांनी मोठ्या रकमेची रोकड जप्त केल्याचे दिसून आले.भिवंडीमधून पहिल्या दिवशी साडेचार लाख रुपये आणि शुक्रवारी दोन लाख १४ हजार आणि १० लाखांची रक्कम वाहनातून पकडण्यात आली. या रोकडजप्तीच्या तीन घटना भिवंडीमध्ये घडल्या आहेत. तर, ठाणे मतदारसंघातील बेलापूर विधानसभा मतदारसंघामधील उरणफाटा ब्रिज येथे वाहनातून घेऊन जात असलेली १० लाखांची रक्कम पकडली आहे.मतदारसंघातील अवैध घटनांवर लक्षया खर्च निरीक्षकांच्या कार्यालयातदेखील नागरिकांकडून काहीही तक्रारी आलेल्या नाहीत. पण, येथील पथकांनी सध्या रस्त्यांवरील अवैध घटनांवर लक्ष केंद्रित केले आहे. निवडणूक उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आणि उमेदवारी माघारी घेण्याच्या कालावधीत संबंधित ठिकाणी खर्च निरीक्षक संबंधित कार्यालयात थांबणार असल्याचे खर्च निरीक्षक विवेकानंद यांनी सांगितले. यामुळे तिन्हीही खर्च निरीक्षकांच्या कार्यालयांमधील दूरध्वनी सध्या उचलण्यात येत नसल्याचे सांगितले जात आहे.

जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात अवैध रकमेचा पुरवठा कोठूनही होऊ नये, यासाठी खर्च निरीक्षकांच्या नजरा चौफेर लक्ष ठेवून आहेत. बँकांमधून होणाºया आर्थिक व्यवहारांवरदेखील नजर ठेवून आहे. संशयास्पद व्यवहार आढळून आल्यास संबंधित बँकांनी तत्काळ निवडणूक यंत्रणेस कळवण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

टॅग्स :thane-pcठाणे