शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

पावसामुळे लक्षावधी ‘लोकलकैद’; तीन तासांपेक्षा जास्त काळ प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 12:32 AM

गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अगोदरच विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पार कोलमडली.

डोंबिवली : गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अगोदरच विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पार कोलमडली. घाटकोपर ते माटुंगादरम्यान रेल्वेरुळांवर पाणी साचल्याने मुंबईकडे जाणारी व येणारी वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरू होती. एकापाठोपाठ उपनगरीय लोकलची रांग लागल्याने ठाणे, डोंबिवली, कल्याण व बदलापूरमधील लक्षावधी रेल्वे प्रवासी तब्बल दोन ते तीन तास लोकलमध्ये अडकून पडले. बहुतांश प्रवाशांनी रेल्वेमार्गातून पायपीट करून जवळचे स्थानक गाठून परतीचा प्रवास केला. काही प्रवाशांना सोशल मीडियातून या लोकलहालांची पूर्वसूचना मिळाल्याने त्यांनी महाविद्यालये, कार्यालये यांना दांडी मारून चक्क यंदाच्या पावसाळ्यातील पहिली सुटी एन्जॉय केली.रविवारी मध्यरात्रीपासून ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे सोमवार सकाळ उजाडली, तीच घरासमोर साचलेले पाणी आणि रेल्वेच्या गोंधळाच्या बातमीने. शेजारील पालघर जिल्ह्यात तर पावसाने हाहाकार उडवला. अनेक ठाणेकर, डोंबिवलीकर व बदलापूरकर आपल्या नियोजित वेळी स्टेशनवर पोहोचले. मात्र, त्यावेळी स्टेशनवर पाऊल ठेवायलाही जागा नव्हती. एकीकडे लोणावळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरल्याने कर्जतकडून येणाºया लोकलची वाहतूक विस्कळीत होती, तर दुसरीकडे घाटकोपर ते माटुंगादरम्यान रुळांवर बरेच पाणी साचल्यामुळे लोकलसेवा जवळपास ठप्प झाली होती. तब्बल २५ ते ३० मिनिटांच्या अंतराने एखादी लोकल येत होती व स्टेशनवरील प्रवाशांचा लोंढा त्यामध्ये घुसण्याकरिता धडपडत असल्याचे चित्र दिसत होते. या लोकलला लटकून गेलेले प्रवासी हे लोकलची रांग लागलेली असल्याने वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांमध्ये अडकून पडले. बराच काळ लोकल जागेवरून हलत नाही, हे पाहिल्यावर अनेकांनी त्यामधून रेल्वेमार्गात उड्या ठोकल्या आणि साचलेल्या पाण्यातून धोकादायक पायपीट सुरू केली.निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले, गरोदर महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी या लोकलहालात न सापडता कार्यालयाला, महाविद्यालयाला दांडी मारण्याचा निर्धार पक्का केला. व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा एसएमएस करून त्याची सूचना दिल्यावर या मंडळींनी आपले पाऊस एन्जॉय करण्याचे बेत नक्की केले. त्यामुळे कुणाची पावले थिएटरकडे वळली, तर कुणी हॉटेलात जाऊन गरमागरम भजी-चहा यांचा फन्ना उडवला.राज्यमंत्र्यांचाही लेटमार्कसर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचा सोमवारी पावसामुळे लेटमार्क झाला, तसाच फटका राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही बसला. डोंबिवली लोकलचा पंचविसावा वाढदिवस साजरा करून चव्हाण हे डोंबिवलीमधून सुटणाºया लोकलने सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे निघाले.सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांना हजेरी लावायची होती. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात पोहोचायला त्यांना तब्बल अडीच तास लागला. शुक्रवार-शनिवारपासून कोसळणाºया पावसामुळे गेले चार दिवस मध्य रेल्वेची वाहतूक किमान १५ ते २० मिनिटे विलंबाने सुरू आहे. सायन, माटुंगा स्थानकांत प्रथम तर त्यानंतर कुर्ला रेल्वेस्थानकात पाणी तुंबल्याने त्याचा फटका कल्याण, कसारा, कर्जत, बदलापूर, टिटवाळा आदी स्थानकांमधून मुंबईच्या दिशेने येणाºया लाखो प्रवाशांना बसला.ठाणे स्थानकापर्यंत लोकल काहीशा विलंबाने धावल्या, पण त्यानंतर मात्र मुलुंड ते कुर्ला, दादरपर्यंत सुमारे २५ मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर ते दीड तास लागल्याने प्रवाशांनी प्रचंड संताप व्यक्त केला. सकाळी साडेआठ वाजल्यापासून हा घोळ सुरू झाला. परिणामी कल्याण-ठाणे मार्गावरील प्रवासी ठिकठिकाणी लटकले. बहुतांश स्थानकांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने प्रचंड दुर्गंधी, माशांचे साम्राज्य पसरले असल्याने लोकांना बसायला धड कोरडी जागा नव्हती.डोंबिवली स्थानकात डोंबिवली लोकलच्या पंधविसाव्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन असल्याने सर्व फलाटांवर प्रवासी ताटकळले होते. फलाट क्र.-५ वरील जलद मार्गाच्या लोकलसेवेतील विलंब व नंतर व्यत्यय यामुळे जलद लोकलचा नाद सोडून अनेक प्रवाशांनी धीम्या मार्गावरील लोकलकरिता फलाट क्र.-३ व २ कडे धाव घेतल्याने या दोन्ही फलाटांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. मात्र, अल्पावधीत धीम्या मार्गावरील लोकलसेवाही ठप्प झाली.त्याचवेळी जलद मार्गावरून लांब पल्ल्यांच्या गाड्या पुढे नेण्यात आल्याने प्रवाशांचा संताप झाला. बदलापूरचे प्रवासी संजय मेस्त्री यांनी आणीबाणीच्या परिस्थितीत लोकल प्रवाशांना वाºयावर सोडणाºया अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ‘लोकमत’ला दूरध्वनी करून केली. रात्री उशिरापर्यंत हा गोंधळ आटोक्यात आला नव्हता.सोशल मीडियात रेल्वे प्रशासनावर झोडलोकलसेवेच्या घोळामुळे सोशल मीडियावर मध्य रेल्वे प्रशासनावर टीकेची प्रचंड झोड उठवण्यात आली. प्रवाशांनी ठिकठिकाणचे फोटो, व्हिडीओ टाकून रेल्वेच्या नालेसफाईबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली. प्रवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही प्रवाशांनी लक्ष्य केले.पावसाची पुन्हा दमदार हजेरीतीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते, तर काही ठिकाणी वृक्ष पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. मुंब्य्रात घराचे प्लास्टर अंगावर पडून एक महिला जखमी झाली. गडकरी रंगायतन येथेही संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली.शहरात मागील १२ तासांत ५१.७७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रविवारी रात्रीपासूनच शहरात पाऊस बरसत होता. सकाळी काहीशी उसंत घेतल्यानंतर दुपारी पुन्हा जोरदार बरसला. दरम्यान, शहरातील मुंब्रा भागातील अमृतनगर भागात एका घराचे प्लास्टर पडून भागमती यादव (३०) ही महिला जखमी झाली. ज्ञानेश्वरनगर भागात वृक्ष पडल्याने तीन दुचाकींचे नुकसान झाले.गडकरी रंगायतन येथेही एका इमारतीची संरक्षक भिंत पडल्याची घटना घडली. शहरातील सावरकरनगर, समतानगर, गावंडबाग, कोपरीगाव आदी ठिकाणी वृक्ष पडल्याच्या घटना घडल्या. दुपारी १२.५२ वाजता खाडीला ३.४९ मीटरची भरती असल्याने त्यानुसार सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. परंतु, यावेळेत पावसाने काहीशी उसंत घेतली.लोकलसेवाही झाली विस्कळीत; गर्दीने प्रवाशांचे हालसातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे सोमवारीही मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम या मार्गांवर सकाळच्या सुमारास पाहण्यास मिळाला. त्यातच उशिराने धावणाºया लोकलमुळे ठाणे रेल्वेस्थानकात एकच गर्दी झाली होती. यावेळी लोकल पकडताना काही किरकोळ चेंगराचेंगरीची घटना घडली असली, तरी त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दुपारनंतर लोेकलसेवा काही प्रमाणात सुरळीत होताना दिसून येत होती. तसेच दुपारी दीड वाजेपर्यंत सीएसएमटीकडे आणि कर्जत आणि आसनगाव अशा चार विशेष लोकल ठाण्यातून सोडल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.मागील तीन दिवसांपासून पडत असणाºया पावसामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी मुंबईतील सायन, कांजूरमार्ग आदी ठिकाणी रेल्वे ट्रॅकमध्ये पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. परिणामी, सकाळी कामावर निघणाºया चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. मुंबईकडे जाणाºया लोकल उशिरा येत असल्याने ठाणे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी १२ वा.च्या सुमारास फलाट क्र मांक-४ वर मुंबईच्या दिशेकडे जाण्यासाठी आलेली लोकल पकडण्यासाठी महिला प्रवाशांची झुंबड उडाली होती. यात काही महिला एकमेकांच्या अंगावर पडून किरकोळ स्वरूपाची चेंगराचेंगरी झाली.पण, लोकल उशिरा धावत असल्याने खबरदारी म्हणून स्थानकावर तैनात असणाºया होमगार्ड आणि जीआरपीएफ जवानांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सूत्रांनी सांगितले. ठाणे रेल्वे प्रशासनाने उपलब्ध झालेल्या लोकलपैकी दोन लोकल सीएसएमटीकडे तर कर्जत आणि आसनगाव या दिशेला प्रत्येकी एकेक लोकल सोडली. तसेच ज्याप्रमाणे लोकल येत होत्या. त्याप्रमाणे वाहतूक काही मिनिटे उशिराने सुरू असल्याचे सांगितले.

टॅग्स :Mumbai Localमुंबई लोकल