शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अंगणवाड्यांत शुद्ध पाण्याचा अभाव; शंभर दिवसांत पाणी देण्याचे उद्दिष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 3:36 AM

५२,२६९ अंगणवाड्यांमधील चित्र

-  नारायण जाधवठाणे : पुरोगामी आणि नगरविकाससह औद्योगिक विकासाच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील ४४९ ग्रामीण व एकात्मिक आदिवासी बालविकास प्रकल्पांतर्गत ९३ हजार ६७५ अंगणवाड्या असून, यापैकी तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये २४ तास शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्याचे वास्तव आहे. हि भीषण बाब समोर आल्यानंतर उशिरा का होईना, आता जल जीवन मिशन अंतर्गत या अंगणवाड्यांना येत्या १०० दिवसांत शुद्ध पाणी देण्याचे लक्ष्य पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. यासाठी ग्रामपंचायती, अंगणवाडी सेविका, महिला बालविकास विभाग, संबंधित जिल्हा परिषद, सर्व शिक्षा अभियानांची मदत घेतली जाणार आहे. त्यांनी सर्व्हे करून ज्या अंगणवाड्यांत पाणी नाही, त्यांच्या माहितीसह सध्या उपलब्ध असलेले पाण्याचे स्रोत आणि उपायांची माहिती दिल्यानंतर संबंधित अंगणवाडीत २४ तास शुद्ध पाणीपुरठा करण्याचे उद्दिष्ट आहे. अंगणवाडीत ० ते सहा वयोगटांतील बालके, गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींची काळजी घेतली जाते. मात्र, महाराष्ट्रातील तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये पाणीच नसल्याने, यांच्या तेथे येणाऱ्या उपरोक्त घटकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होतो. शु्द्ध पाण्याअभावी त्यांना तासनतास तहानलेेले राहावे लागते किंवा अशुद्ध पाणी प्यावे लागते, तसेच अनेक ठिकाणी पाणीच नसल्याने नैसर्गिक विधी करण्यासही अडचणी निर्माण होऊन ते अनारोग्याच्या खाईत सापडत आहेत.शुद्ध पाण्यासाठी शोधले चार उपाय अंगणवाडीत शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी चार उपाय शोधले आहेत. यात ज्या अंगणवाडीच्या परिसरात शुद्ध पाण्याची बोअरवेल आहे, तेथे सबमर्सिबल पंप बसवून पाणी द्यावे, बोअरवेलला हंगामी पाणी असल्यास भूजल तज्ज्ञांचे मत घेऊन त्यात सुधारणा करून पाणी पुरविणे, गावात पाणीपुरवठा योजना आहे, परंतु भौगोलिक अंतरामुळे अंगणवाडीला शुुद्ध पाणी देणे शक्य नाही, तेथे नळपाणीपुरवठा योजनेतून पाइपलाइन टाकून नळजोडणी देणे आणि पाणीपुरवठा योजना आहे, परंतुु त्यात काही बिघाड असल्यास तो दुुरुस्त करून अंगणवाडीस पाणी देेणे असे हे चार उपाय आहेत.आरोग्याचा प्रश्न   महाराष्ट्रातील तब्बल ५२ हजार २६९ अंगणवाड्यांमध्ये पाणीच नसल्याने, यांच्या तेथे येणाऱ्या घटकांच्या आराेग्याचा प्रश्न निर्माण होतो. शु्द्ध पाण्याअभावी त्यांना तासनतास तहानलेेले राहावे लागते .