जितेंद्र कालेकरठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी बँकांच्या एटीएम केंद्रावरही अधिक खबरदारी घेणे गरजेचे आहे. मात्र, ठाणे शहरातील ३५० पैकी बहुतांश एटीएम केंद्रांमध्ये साधे सॅनिटायझरही ठेवलेले नाही. त्यामुळे अशा केंद्रांतूनही कोरोना पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. रोज किमान दोन कोटींची रोकड या एटीएम केंद्रांमधून काढली जाते, मग बँकांनी या एटीएम केंद्रांची निगाही ठेवण्याची गरज असल्याचे ग्राहकांनी सांगितले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एटीएम केंद्रांना अधिक महत्त्व आले आहे. ठाणे शहरात ४१ बँकांचे २००च्या घरात एटीएम आहेत. याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सॅनिटायझर ठेवणे, केंद्रात जाताना तसेच आतही सोशल डिस्टन्सिंग पाळणे अपेक्षित आहे. मात्र, ठाण्यातील ९० टक्के एटीएम केंद्रांवर सॅनिटायझरचा, स्वच्छतेचा अभाव आढळला. वर्तकनगर, जांभळीनाका, खाेपट, समतानगर, पाचपाखाडीतील ठाणे महापालिकेच्या मुख्यालय परिसरातील केंद्रांवर सॅनिटायझरचा अभाव होता. मात्र, काही ठिकाणी सुरक्षारक्षक ग्राहकांमध्ये साेशल डिस्टन्सिंग राखण्याचा प्रयत्न करत होते.
साफसफाई रोज होते का?अनेक एटीएम केंद्रावर दररोजच्या साफसफाईचाही अभाव आहे. अनेक केंद्रांवर सकाळी एकदा साफसफाई होते. त्यानंतर कर्मचारी येतात, अशी माहिती एका बँक कर्मचाऱ्याने दिली.
खबरदारी न घेतल्यास काेराेना पसरण्याची भीतीएटीएम केंद्रावर एसी असल्यामुळे कोरोनाचा विषाणू टिकतो. त्यासाठी मास्क, सॅनिटायझर आवश्यक आहे. त्यासाठी प्लास्टिक कागद असावा. खबरदारी न घेतल्यास कोरोना पसरण्याची भीती आहे. - डाॅ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयमास्क लावूनच ग्राहकांना प्रवेशसर्वच बँकांनी एटीएम केंद्राच्या बाहेर सॅनिटायझर ठेवणे अपेक्षित आहे. सामाजिक अंतर ठेवून, मास्क लावूनच एटीएम केंद्रात प्रवेश दिला जातो. - जयानंद भारती, लीड बँक, ठाणे
सुरुवातीलाच घेतली दक्षता बहुतांश बँकाच्या एटीएमवर सुरुवातीच्या काळात सॅनिटायझरही ठेवले होते. आता ते अनेक केंद्रांवरून गायब झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची सुरक्षाच धाेक्यात आहे.