शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
7
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
8
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
9
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
10
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
11
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
12
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
13
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
14
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
15
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
16
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
17
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
18
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
19
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
20
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"

उर्दू शाळांच्या नशिबी उपेक्षाच

By admin | Published: September 02, 2015 3:36 AM

येथील पश्चिमेकडील बल्याणी परिसरातील उर्दू माध्यमाच्या बन्दे अली खान या शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना एकाच वर्गात दाटीवाटीने बसावे लागते.

प्रशांत माने, कल्याणयेथील पश्चिमेकडील बल्याणी परिसरातील उर्दू माध्यमाच्या बन्दे अली खान या शाळेत शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांना एकाच वर्गात दाटीवाटीने बसावे लागते. तर मांडा-टिटवाळा येथील मौलान आझाद प्राथमिक शाळेतील पटसंख्येवर जागेच्या कमतरतेमुळे परिणाम झाला आहे. या परिस्थितीवरून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण मंडळ प्रशासनाला उर्दू माध्यमाचे वावडे आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. मांडा परिसरात ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. तिची पटसंख्या ७३ इतकी आहे. इयत्तांचा आढावा घेता पहिलीत ११, दुसरीत १८, तिसरीमध्ये २६ आणि चौथीत १८ विद्यार्थी आहेत. सकाळी ११ ते सायंकाळी ५ यावेळेत ती भरते. दोन शिक्षक याठिकाणी कार्यरत आहेत. बालवाडीत ३४ विद्यार्थी शिकत असून त्यांची वेळ सकाळी ९ ते ११ अशी आहे. बहुतांश शालेय साहित्य विद्यार्थ्यांना मिळाले आहे. परंतु, गणवेश आणि बूट वाटपाला अद्यापपर्यंत प्रशासनाला मुहूर्त मिळालेला नाही. शालेय पोषण आहार नियमितपणे मिळत आहे. शाळेला सफाई कर्मचारी दिलेला नाही. त्यामुळे येथील स्वच्छतेची जबाबदारी पोषण आहार वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांमधील एका महिलेला पार पाडावी लागते. विशेष बाब म्हणजे मस्जीद ट्रस्टच्या जागेत ती भरते. याठिकाणी एकच खोली उपलब्ध असून चारही इयत्तांचे वर्ग जागेअभावी एकत्रित भरविले जातात. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचेस आहेत. परंतु, जागा अपुरी असल्याने जमिनीवर सतरंजी अंथरूण विद्यार्थ्यांना बसविले जाते. मांडा-टिटवाळा परिसरात उर्दू माध्यमाची अन्य शाळा नाही. त्यामुळे महापालिकेच्या या शाळेला पुरेशी जागा मिळाली तर पटसंख्या वाढेल असा विश्वास व्यक्त होत आहे. याआधी शाळेची पटसंख्या २५ ते ३० इतकी होती ती आता ७३ च्या आसपास पोहोचली आहे. शिक्षण मंडळ प्रशासनाने जर जागेबरोबरच पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास पटसंख्या वाढीला पोषक वातावरण ठरणार यात शंका नाही.