लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : बँकेची केवायसी अर्थात खातेदाराची माहिती अद्ययावत करावयाची असल्याचे सांगून ठाण्याच्या देवश्री गार्डन येथील सत्तरवर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे एका भामट्याने एक लाख ३९ हजार ८०० रुपये लुबाडल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.ठाणे पश्चिम भागातील देवश्री गार्डन येथील रहिवासी श्रीकृष्ण छत्रे हे २५ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० ते २.५४ वाजण्याच्या सुमारास घरी होते. त्याचदरम्यान त्यांना राजेंद्र प्रसाद अशी ओळख सांगणाऱ्या एका भामट्याने फोन केला. आपल्या बँक खात्याचे केवायसी अद्ययावत करायची असल्याचा त्याने बहाणा केला. त्याच बहाण्याने त्यांची पत्नी आणि मुलगा यांच्या बँक खात्याची माहिती तसेच ओटीपी क्रमांक फोनवरच त्याने घेतला. नंतर त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या बँक खात्यातील एक लाख ३९ हजारांची रक्कम आॅनलाइन काढून घेतली. आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात २६ सप्टेंबर २०१९ रोजी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक हुंबे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.-
ठाण्यात बँकेची ‘केवायसी अपडेट’ करण्याच्या नावाखाली सव्वा लाखाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 9:56 PM
खातेदाराची माहिती अद्ययावत करावयाची असल्याचे सांगून ठाण्याच्या सत्तरवर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या कुटूंबियांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून एका भामटय़ाने एक लाख 39 हजार 800 रुपये लुबाडल्याची घटना नुकतीच घडली.
ठळक मुद्देराबोडीतील ७० वर्षीय जेष्ठ नागरिकाला गंडाराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फोनवरुनच घेतली बँक खात्यांची माहिती आणि मिळविला ओटीपी क्रमांक