लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: भिवंडीतील गोदामातून लाखो रुपयांचा कपडयाचा धागा (यार्न) चोरणाºया आसिफ खान (२६, रा. भिवंडी, ठाणे) याच्यासह पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून १८ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांची ११ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.भिवंडीत हातमाग तयार करण्याचे कारखाने असून या भागातील कापड तयार करण्यासाठी लागणारा कपडयाचा धागा आणि कापड यांची साठवणूक याच भागातील गोदामांमध्ये मोठया प्रमाणावर होते. अलिकडेच काही गोदांमांमधून कपडयाचा यार्न (धागा) आणि कापड चोरीच्या गुन्हयांमध्ये वाढ झाल्यामुळे हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरु होता. दरम्यान, कपडयाचा धागा आणि कापड चोरी करणारी टोळी कार्यरत असून त्यातील काहीजण भिवंडीतील समदनगरातील एकता हॉटेल येथे येणार असल्याची ‘टीप’ पोलीस नाईक अमोल देसाई यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, उपनिरीक्षक दत्तात्रय सरक, हवालदार रवींद्र पाटील, चंद्रकांत वाळूंज आणि पोलीस नाईक अमोल देसाई यांच्या पथकाने १५ आॅक्टोबर रोजी असिफ खान, जावेद खान, अमान खान, मोहम्मद इम्रान शेख आणि आदिल मोमीन या पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत नारपोली आणि भिवंडी तालुका येथील पाच गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून विक्रीसाठी ठेवलेला चोरीतील १८ लाख ८८ हजारांचा कपडयाचा धागा जप्त करण्यात आला आहे. सुरुवातीला या आरोपींना २३ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. २५ आॅक्टोंबरला भिवंडी तालुका पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. २९ आॅक्टोबरपर्यंत पुन्हा पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांना ११ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.* चोरीतील कपडयाची योग्य किंमत न मिळाल्यामुळे तसेच त्यांच्या पावत्याही नसल्यामुळे या मालाला गिºहाईक मिळत नव्हते. गिºहाईकांच्या शोधात असतांनाच युनिट एकच्या पथकाने त्यांना पकडले.
लाखो रुपयांच्या कपडयाचा धागा चोरणारी टोळी जेरबंद: १८ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 12:03 AM
भिवंडीतील गोदामातून लाखो रुपयांचा कपडयाचा धागा (यार्न) चोरणाऱ्या आसिफ खान (२६, रा. भिवंडी, ठाणे) याच्यासह पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. चोरीच्या मालासाठी गिºहाईकांच्या शोधात असतांनाच युनिट एकच्या पथकाने त्यांना पकडले.
ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईचोरीचा माल विक्रीच्या तयारीत असतांनाच आरोपी जेरबंद