-----------------------------------------
रोकडसह दागिन्यांची चोरी
डोंबिवली : कचोरेगाव परिसरातील न्यू गोविंदवाडी भागात राहणारे अरसलान मुनीर शेख हे आपल्या परिवारासह रविवारी पहाटेच्या सुमारास घरात झोपले असताना चोरट्यांनी घरात शिरून रोकड आणि सोन्याचे दागिने, असा ४० हजार १०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------------------------
दुचाकीची चोरी
डोंबिवली : मानपाडा रोडवरील शंखेश्वरनगर परिसरात राहणारे जयेश पाटील यांनी त्यांची दुचाकी रविवारी संध्याकाळी ६ ते ८ या कालावधीत चाररस्ता जैन मंदिर याठिकाणी पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेली असून, पाटील यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
------------------------------------------
मोबाइल चोरीला
डोंबिवली : ठाकुर्ली चोळेगाव परिसरात राहणाऱ्या सुचित्रा गाडे या शनिवारी रात्री १०.३० वाजता पूर्वेकडील ९० फूट रोडवरून जात होत्या. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांपैकी एकाने गाडे यांच्या हातातील मोबाइल हिसकावून घेत पलायन केले. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
----------------------------------------
वाहन चोरी
कल्याण : येथील पश्चिमेकडील रामबाग लेन ४ मध्ये राहणाऱ्या संदीप थालिया यांनी राहत असलेल्या घराजवळ दुचाकी पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
---------------------------------------
लोखंडी जाळ्या लंपास
कल्याण : पश्चिमेकडील रौनक सिटी या गृहसंकुलात ड्रेनेज टाक्यांवर लावण्यात आलेल्या लोखंडी जाळ्या चोरीला गेल्याची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. सात हजार ५०० रुपये किमतीच्या पाच लोखंडी जाळया चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
---------------------------------------