ठाणे: येथून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी लागणारी २२ हेक्टर ४८ आर जमिनीचे १०० टक्के भूसंपादन गुरूवारी पूर्ण करण्यात आले आहे. त्यासाठी मौजे आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शिळ व देसाई, आदी ठिकाणचे अतिक्रमणही तत्काळ पाडून या बुलेट ट्रेनसाठी लागणारी जागा उपलब्ध करून दिल्याचे उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी लोकमतला सांगितले.
ठाणे शहर परिसरातून जाणाºया या मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा खुला ताबा सक्तीने नॅशनल हायस्पीड रेल कॉपोर्रेशनला ३० सप्टेंबरपर्यंत देण्याचे आदेश जारी झाले होते. त्याची गांभीर्याने दखल घेत आगासन, म्हातार्डी, बेतवडे, डावले, पडले, शिळ व देसाई आदी ठिकाणचे अतिक्रमण, निवासी घरे, गाळे जेसीबीच्या सहाय्याने तोडले आहे. यामध्ये १२ बांधकामे ही चार सर्वेनंबरमधून तोंडली आहेत.
ठाणे तालुक्यातील या मुंबई -अहमदाबाद हायस्पिड प्रकल्प म्हणजे बुलेट ट्रेनच्या भूसंपादनची शंभर टक्के कार्यवाही पूर्ण होऊन जमिनीचा शंभर टक्के ताबा मुंबई -अहमदाबाद हायसिप्ड प्रकल्पाच्या अधिकाºयांना दिला आहे. यासाठी सरकारी आणि खाजगी जमिनीवरील सर्व बांधकामे तोडून खुल्या जागेचा ताबा बुलेट ट्रेन च्या अधिकाºयाना आज दिल्याचे शिंदे यांनी लोकमतला सांगितले.
या रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीचे भोगवटादार यांच्याकडून घेऊन या बुलेट ट्रेन प्रशासनाकडे जमीन हस्तांतरीत करण्यासाठी या प्रकल्पाच्या समिती प्रमुखांसह नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकाारी,ठाणे समिती उपप्रमुख , तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी आदी यंत्रणा या गांवामध्ये तैनात करून संपूर्ण जागा मोकळी केली आणि बुंलेट ट्रेन प्रशाासनाकडे सुपूर्द केल्याचे शिंदे यांनी सांगितले. या रेल्वे प्र्रकल्पासाठी लागणाºया भूखंडावर वसलेल्या रहिवाश्यांकडून प्रशासनाला कडाडून विरोध झाला. मात्र पोलिस बळासह जिल्हा प्रशासनाच्या अधिकाºयांनी यावर मात करून या जमिनीचे भूसंपादन पूर्ण केले. भूसंपादित केलेल्या या २२ हेक्टरपैकी खासगी मालकीचे १८ हेक्टर आठ आर ८१ चौ.मीटर जागे भूसंपादन करण्यात आले आहे. याशिवाय ठाणे महापालिका क्षेत्रातील ३९ आर ७७ चौ.मीटर च्या भूखंडासह केंद्र शासनाच्या मालकीची एक आर ३३ चौ.मीटर जागा संपादीत केली आहे. याप्रमाणेमधील जमीन एक हेक्टर ७७ आर ८७ चौ.मीटर आहे. तर मध्य रेल्वेच्या मालकीची ४२ आर ३९ चौ.मीटर जागा संपादीत केली आहे. यामध्ये राज्य शासनाच्या मालकीची दोन हेक्टर ३२ आर १० चौ.मीटर जागा आहे. याशिवाय खाजगी जमीन वाटाघाटी अन्वये खरेदी केलेली सहा हेक्टर, ४८ आर, २१ चौ.मीटर असल्याचे शिंदे यांनी निदर्शनात आणून दिले.