- सुरेश लोखंडेठाणे : विरार-अलिबाग या महामार्गासाठी ठाणे जिल्ह्यातील भिवंडीसह कल्याण, अंबरनाथ तालुक्यांतील शेतकºयांच्या जमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे खरेदी पद्धतीने संपादित केल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे ७० हेक्टर शेतजमीन संपादन केली जाणार आहे. यापैकी अंबरनाथ तालुक्यातील पाली, ना-हेण आणि कारवली गावातील शेतकºयांच्या सुमारे चार लाख ६४ हजार ६१६.५९ चौरस मीटर म्हणजेच सुमारे ४६.४६१६६ हेक्टर शेतजमिनीच्या भूसंपादनासाठी संमतीपत्रे घेण्याचे काम सुरू झाले आहे.चोहोबाजूने खाडीने वेढलेल्या ठाणे जिल्ह्यास लोहमार्गासह आता महामार्गांनीदेखील मगरमिठी मारायला घेतली आहे. समृद्धी महामार्गासह गुजरात बडोदरा-जेएनपीटी महामार्ग आणि आता विरार-अलिबाग सुमारे १२१ किमीचा महामार्ग टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.संपादित होणाºया या शेतजमिनीपैकी सुमारे ४६.४६१६६ हेक्टर शेतजमिनीच्या संपादनासाठी पाली, नाºहेण व कारवले येथील शेतकºयांची संमतीपत्रे घेतली जात आहेत. यामध्ये पाली येथील शेतकºयांच्या सुमारे ६.६५८४०१ हेक्टर शेतजमिनीसह नाºहेणच्या शेतकºयांची सुमारे २१.७२६०.३७ हेक्टर आणि कारवले येथील १८.०७७२२२ हेक्टर शेतजमीन जात आहे. सुमारे १२१ किमी लांबीचा हा मिनी महामार्ग बहुउद्देशीय मार्गिका म्हणजेच कॉरिडॉर महामार्गासाठी वापरला जाणार आहे. थेट अलिबाग बंदराला जोडलेला हा महामार्ग आहे. या महामार्गामुळे सुमारे साडेचार तासांचा प्रवास अवघ्या एक ते दीड तासाच्या कालावधीत पार करता येणार आहे. जेएनपीटी कॉरिडॉरच्या आधी हा महामार्ग तयार होत आहे. या शेतजमिनी खाजगी वाटाघाटीद्वारे थेट खरेदी पद्धतीने एमएमआरडीए संपादन करत आहे. जिल्हास्तरीय समितीमार्फत भूसंपादन कायद्याच्या तरतुदीस अनुसरून एमएमआरडीएच्या नावे या जमिनीची खरेदी होत आहे.‘विरार-अलिबाग महामार्ग जमिनीसाठी बाजारबोली’अलिबाग समुद्रातील बंदरास जोडण्यासाठी एमएमआरडीएद्वारे विरार-अलिबाग ही बहुउद्देशीय मार्गिका (महामार्ग) तयार करण्यात येत आहे. याबाबत ‘विरार-अलिबाग महामार्ग जमिनीसाठी बाजारबोली’ या मथळ्याखाली लोकमतने २२ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून संबंधित हालचाली उघड केल्या होत्या. यानुसार, प्रथम अंबरनाथ तालुक्यातील पाली, नाºहेण आणि कारवली या तीन गावांमधील शेतकºयांकडून त्यांच्या शेतजमिनी संपादनासाठी नोटीस देऊन संमतीपत्रे भरून घेण्याचे काम उल्हासनगर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून युद्धपातळीवर सुरू झाले आहे.
विरार-अलिबाग महामार्गासाठी होणार भूसंपादन , ७० हेक्टर शेतजमीन ताब्यात घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 6:18 AM