ठाणे : मंगळवारी सापडलेल्या 117 रुग्णांपाठोपाठ बुधवारीही ठाणे जिल्ह्यातील 115 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मिराभाईंदरमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या पॉझिटिव्ह रुग्णांमुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या एक हजार 513 इतकी झाली असून या आजारामुळे मृत्यूमुखींची संख्या ही 40 वर पोहोचली आहे.
बुधवारी सर्वाधिक 46 रुग्ण हे ठामपामध्ये तर त्यापाठोपाठ नवीमुंबईत 45 रुग्ण सापडले आहेत.तर भिवंडी,अंबरनाथ आणि बदलापूर येथे एक ही नवीन रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात बुधवारी 46 बाधितांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या 496 वर पोहोचली आहे. नवी मुंबईतही 45 नव्या रुग्णांची नोंद झाली असून तेथे ही बाधित रुग्णांची संख्या 440 वर गेली आहे. कल्याण डोंबिवलीत नवे नऊ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या 233 झाली आहे. तसेच मीराभाईंदरमध्ये सहा रुग्ण आढळून आल्याने तेथील बाधितांची संख्या 196 झाली असून त्यातच दोघांचा मृत्यू झाल्याने तेथील मृतांचा आकडा सात वर झाला आहे.
उल्हासनगरात एका नव्या रुग्णाची नोंद झाल्याने बाधितांची संख्या 17 झाली आहे. तर, ठाणे ग्रामीण भागात आठ नव्या बाधितांची नोंद झाल्यामुळे तेथील बाधितांची संख्या 58 झाली आहे. तर,दुसरीकडे बदलापूर, अंबरनाथ आणि भिवंडी येथे एकही नवीन रुग्ण बुधवारी सापडला नसल्याने तेथील रुग्ण संख्या स्थिर असून ती अनुक्रमे 42, 11 आणि 20 अशी असल्याची माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली.
महत्वाच्या बातम्या...
OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली
CoronaVirus धारावीने चिंता वाढवली; नव्या रुग्णांमध्ये मोठी वाढ
CoronaVirus व्वा...! राज्यात केवळ दोन दिवसांत ७०० रुग्ण ठणठणीत झाले
धक्कादायक! योगी आदित्यनाथांना क्वारंटाईन तरुण भेटला; उत्तर प्रदेशात उडाली खळबळ
CoronaVirus महिला कोरोनाबाधित सापडली; खासगी हॉस्पिटलने गुपचूप सरकारी रुग्णालयात सोडले