शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

देशातील मोठा पॉवरलूम मेगा क्लस्टर भिवंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 4:15 AM

जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : पॉवरलूम असोसिएशनशी बैठक

ठाणे : देशातील सर्वात मोठे पॉवरलूम मेगा क्लस्टर भिवंडी येथे उभारण्याच्या दृष्टीने जोरदार पावले उचलण्यात आली आहेत. मंगळवारी वस्त्रोद्योग सचिव अतुल पाटणे यांनी भिवंडी पॉवरलूम असोसिएशनच्या सदस्यांसमवेत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन या प्रकल्पाविषयी सकारात्मक चर्चा केली. सुमारे प्रथम १५० एकर भूखंडावर हा पॉवरलूम मेगा क्लस्टर उभारला जाणार आहे. मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणाऱ्या या हबसाठी जमीन उपलब्धतेसह अन्य गोष्टींसाठी प्राध्यान्यक्रम देण्याचे आश्वासन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले.

या बैठकीत भिवंडीत निर्यात प्रोत्साहनसंदर्भात एक कक्ष जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने सुरू करण्यासाठी ही यावेळी चर्चा झाली. बैठकीत वस्त्रोद्योग संचालक माधवी खोडे यांनी देखील या हबची माहिती देऊन आजच्या स्थितीचे महत्त्व पठवून दिले. एमआयडीसी स्पेशल पर्पज व्हेईकल करून त्या माध्यमातून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उभारणी झाल्यास विद्युत मंडळ, प्रदूषण नियंत्रण, महानगरपालिका, महसूल विभाग या व इतर शासकीय संस्थांशी समन्वय साधणे अधिक सोयीस्कर होईल, असे पाटणे यांनी यावेळी स्पष्ट केले.जिल्हा प्रशासनाने समृद्धी महामार्ग, जेएनपीटी, दिल्ली-मुंबई फ्रेट कॉरीडॉर यांचा विचार करून दळणवळणाच्या दृष्टीने योग्य जागेची निवड करावी. यासाठी सुमारे १५० एकर जागेची प्राथमिक आवश्यकता आहे. यामध्ये कॉमन फेसिलिटी सेंटर, पॉवरलूम प्रोसेसिंग, यार्न मार्केट, वर्क शेड्स आदींची आवश्यकता भासणार आहे. याशिवाय याठिकाणी वस्त्रोद्योगाशी संबंधित कौशल्य विकास केंद्रे असतील. पॉवरलूम आधुनिकीकरण योजना याठिकाणी राबविण्यात येतील. सुताचा पुरवठा ते कापडाची निर्यात या संपूर्ण प्रक्रियेसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नसल्याची सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली.पॉवरलूम उद्योगावर ४० लाख लोकांचा चरितार्थच्भिवंडी येथे सुमारे सात लाख पॉवरलूम्स आहेत. त्यात दहा लाखांपेक्षा जास्त कामगार थेट रोजगार मिळवितात अप्रत्यक्षरीत्या ४० लाख लोकांचा जीवन चरितार्थ या उद्योगावर आहे.च्देशातील एकूण यंत्रमागांपैकी ५० टक्के यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. त्यात भिवंडीचा सर्वात अधिक वाटा आहे. पॉवरलूम संस्थांचे बळकटीकरण, कामगारांचे कल्याण मंडळ, यंत्रमाग संजीवनी योजना, परकीय गुंतवणूक आदी माध्यमातून या क्षेत्राच्या समस्या दूर करण्यात येत आहेत.च्भिवंडीत या मेगा क्लस्टरच्या उभारणीने या भागाचा चेहरा मोहरा बदलेल. मात्र, त्यासाठी कालबद्ध रीतीने याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी या बैठकीस उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी केली.सोयीसुुविधासंदर्भात ५ सप्टेंबरला बैठकसोयीसुविधांसंदर्भात सर्व प्रतिनिधींसमवेत ५ सप्टेंबर रोजी प्रांत कार्यालयात चर्चा करण्यात येईल, असे भिवंडी प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी सांगितले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसीचे अधिकारी आदींनी देखील आपली मते मांडली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणे