ठाणे : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांत शासनाचा सर्वच प्रकारचा महसूल जवळजवळ बुडाला आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाचा मागील वर्षाच्या तुलनेत दिवसाकाठी मिळणारा सहा कोटींचा महसूल बुडाला. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर बुधवारी जमीन, घरखरेदी-विक्रीतून एका दिवसात ४६ कोटींचा महसूल प्राप्त झाला असला तरी, पाच महिन्यांत गौण खनिजापोटी मिळणारा सुमारे २८ कोटींचा महसूल बुडाल्याने जिल्हा प्रशासनाला फटका बसला आहे.
ठाणे जिल्हा प्रशासनाला रेती, खडी, माती आदींच्या स्वामित्वधनापोटी (रॉयल्टी) मिळणाऱ्या महसुलात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २८ कोटींची तूट पडल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात ३७ कोटी ६८ लाख रुपयांचा महसूल गौण खनिजातून मिळाला होता. या तुलनेत यंदा २४ कोटी ७१ लाख रुपये महसूल मार्चमध्ये प्राप्त झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १३ कोटी रुपयांचा फटका लॉकडाऊनमुळे बसला आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये दोन कोटी ३२ लाख महसूल मिळाला होता. यंदा तो दोन कोटी १३ लाखांनी कमी झाला. गौण खनिजापोटी मे २0१९ मध्ये १० कोटी ८५ लाखांचा महसूल प्राप्त झाला होता. यावेळी तो नऊ कोटी ६८ लाखांनी कमी होऊन, अवघा एक कोटी १७ लाख ८१ हजारांचा महसूल मेमध्ये जमा झाला आहे.जूनमध्ये तीन कोटी ३२ लाख रुपयांचा महसूल मिळाला. या तुलनेत गेल्या वर्षी एक कोटी २८ लाख जादा जमा झाले होते. जुलैमध्ये गेल्यावर्षी तीन कोटी ६0 लाख जमा झाले होते. यंदा त्यात तब्बल दोन कोटींच्या महसुलाची तूट आली असल्याचे तहसीलदार मुकेश पाटील यांनी सांगितले. कोरोनाच्या कालावधीतही कर्मचाऱ्यांची ७0 ते ८0 टक्के उपस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील जमीन, घर खरेदीविक्रीच्या व्यवहारांतून शासनाला महिनाकाठी १२५ ते १५0 कोटींचा महसूल नोंदणी व मुद्रांक विभागाद्वारे गेल्या वर्षी मिळाला होता. मात्र, यावेळी कोरोनामुळे मोठे व्यवहार झाले नाही. त्यापोटी मिळणाºया महसुलाची झळही शासनाला बसली आहे. अशा परिस्थितीतही बुधवारी, रामजन्मभूमी मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर तब्बल ४६ कोटी ५0 लाखांचा महसूल जिल्ह्यात जमा झाला आहे. जुलैमध्ये ९६ कोटींचा महसूल जमा झाला आहे. मार्च ते ३१ मेपर्यंत एकही दस्तनोंदणी झाली नसल्याची खंत एका वरिष्ठ अधिकाºयाने व्यक्त केली.गतवर्षी २,२३९ कोटींचा महसूल जमाकार्यालये सुरू असूनही नागरिक लॉकडाऊनमुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या कार्यालयाकडे फिरकलेच नाही. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील या नोंदणी व मुद्रांक विभागाने तब्बल दोन हजार २३९ कोटींचा महसूल दस्तनोंदणीतून जमा केला होता.गेल्यावर्षी दिवसाकाठी तब्बल सहा कोटींचा महसूल जमा झाला होता. कोरोनामुळे या विभागाचा गेल्या पाच महिन्यांत करोडो रुपयांचा महसूल बुडाल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्यात अवघा ९६ कोटींचा दस्तनोंदणीचा महसूल जमा झाला आहे.दिवसाकाठी तीन कोटी रुपयांचा महसूल ठाणे दस्तनोंदणीतून जमा झाला आहे. कोरोनाच्या कालावधीत नियमानुसार अधिकारी, कर्मचाºयांनी उपस्थित राहून सेवा सुरू ठेवली. त्यामुळे कर्मचाºयांवर कारवाईचा प्रश्नच आला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.