ठाणे : मुरबाड तालुक्यातील माळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील माळ भांगवाडी येथील काळू नदीवर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या वनराई बंधाऱ्यांमध्य सर्वात मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाºयासाठी १० हजार रिकाम्या गोण्यांचा वापर झाला आहे. ग्रामपंचायतींचे सदस्य, ग्रामस्थ अािण ग्रामसेवक राजाभाऊ सुरवसे यांनी हा मोठा वनराई बंधारा काळू नदीवर श्रमदानातून बांधला आहे. या बंधाºयाची खोली सुमारे सहा फूट आहे. या ठिकाणी खोल डोह असल्यामुळे आणि पाणी साठण्यासाठी मोठा वाव असल्यामुळे या बंधाºयातील पाण्यासाचा साठा मोठ्याप्रमाणात करता येणार आहे. या बंधाºयाच्या नदीपात्राची रुंदी सुमारे १२५ फूट असून त्यावर सुमारे ८० फूट लांब व सहा फूट रुंदीचा हा वनराई बंधारा बांधला आहे. या बंधाºयातील पाणीसाठा एक किलोमीटर दूरपर्र्यंत पसरणार आहे.परिसराची पाणीटंचाई होणार दूरआदिवासी पेसा क्षेत्रातील माळ भांगवाडी हे पाणीटंचाईग्रस्त गांव आहे. येथे दरवर्षी फेब्रुवारी - मार्चमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होते. या टंचाईवर काही अंशी मात करण्यासाठी येथील भांगवाडीच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून काळू नदीवर हा बंधारा बांधला आहे. यामुळे विशाल जलसाठा निर्माण झाला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत नळपाणीपुरवठा योजनेची विहीर नदीपात्रात बांधली आहे. या बंधाºयामुळे या विहिरीसही पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. यामुळे यंदा पाणीटंचाई काही अंशी जाणवणार नसल्याचे भांगवाडी ग्रामस्थांनी सांगीतले. बंधाºयासाठी ग्रामस्थांसह ग्रामसेवक सुरवसे यांच्यासह सय्यद शहा, सुरूशे आदींनी परिश्रम घेतला.
काळू नदीवर जिल्ह्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 1:15 AM