शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

लता, आशा, रफीसह सलमान, आमीर तयार होण्यासाठी ठाण्यात ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 12:44 AM

लता, आशा, रफी यांच्यासारखे गायक-गायिका अन् सलमान, आमीरसारखे अभिनेते निर्माण व्हावेत, यासाठी आता ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे

ठाणे : झोपडपट्टी भागातून ए.आर.रहेमानसारख्या संगीतकारासह लता, आशा, रफी यांच्यासारखे गायक-गायिका अन् सलमान, आमीरसारखे अभिनेते निर्माण व्हावेत, यासाठी आता ठाणे महापालिकेने पुढाकार घेतला आहे. यानुसार, शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी महापालिका गल्ली आर्ट स्टुडिओचे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. त्यानुसार झोपडपट्टीतील मुलांना विविध संस्थांद्वारे नृत्य, अभिनय व संगीत शिकविले जाईल.महापालिकेच्या या प्रस्तावामुळे झोपडपट्ट्यांमधील मुलांच्या उपजत कलागुणांना वाव मिळून त्यातून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, एकीकडे महापालिका शाळांचा दर्जा अद्याप सुधारला नसताना दुसरीकडे गल्लीतील मुलांचा दर्जा सुधारण्याचा गल्ली स्टुडिओचा दावा कितपत यशस्वी होणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष राहणार आहे.महापालिका क्षेत्रात २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १८ लाख इतकी आहे. परंतु, प्रत्यक्षात आजघडीला ती २३ लाखांच्या घरात आहे. यातील ५२ टक्के नागरिक हे झोपडपट्टीत राहत असून त्यामध्ये १८ वर्र्षांखालील मुलांची संख्या १८ हजार इतकी आहे. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध नाही. त्यामुळे कलागुण असतानाही ते मागे पडतात. नेमकी ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या समाजकल्याण विकास विभागाने अशा मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’च्या माध्यमातून हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.>नऊ स्टुडिओंवर २५ लाख खर्चठाणे महापालिका क्षेत्रातील नऊ प्रभाग समित्यानिहाय ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’ची निर्मिती केली जाणार आहे. ‘गल्ली आर्ट स्टुडिओ’च्या माध्यमातून मुलांना नृत्य, अभिनय आणि संगीत शिकविले जाणार आहे. त्यासाठी महापालिका शाळेची जागा शाळेच्या व्यतिरिक्त वेळेत उपलब्ध करून दिली जाणार आहे. नृत्य, अभिनय आणि संगीत यासाठी प्रत्येकी २५ लाख रु पये खर्च केले जाणार आहेत.>महापालिका समुपदेशन करून प्रशिक्षण देणारया माध्यमातून १८ वर्षांखालील मुलांना नृत्य, अभिनय आणि संगीत शिकविले जाणार आहे. सहा ते आठ महिने इतका प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण देणाºया संस्थांच्या निविदा प्रक्रि येद्वारे नियुक्ती केली जाणार आहे. या संस्था झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन मुलांमधील अंगभूत कलागुण ओळखून त्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. आवश्यकता वाटल्यास ते मुलांना समुपदेशन करणार आहेत. या मुलांना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. या प्रकल्पाचे व्यवस्थापन, नियंत्रण, मूल्यमापन, संकलन करण्याची जबाबदारी महापालिकेकडे असणार आहे.