डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेला लाभलेला विस्तिर्ण खाडी किना-याचा लाभ जलवाहतूकीसाठी प्राधान्याने व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आदींची मोलाची साथ असल्याने तशा पद्धतीने या मार्गाचा विकास जलद होणार आहे, असे मत महापौर विनिता राणे यांनी व्यक्त केले.डोंबिवलीच्या पश्चिमेतून जुन्या डोंबिवली परिसरातून जलवाहतूक करणा-या खासगी बोटीचा शुभारंभ राणे यांनी शनिवारी केला. त्यावेळी महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे, सिवकृत नगरसेवक विश्वनाथ राणे, दिपाली पाटील, माजी नगरसेवक पंढरी पाटील यांच्यासह बोट मालक विलास ठाकुर आणि कुटुंबिय उपस्थित होते. डोंबिवली - माणकोली-कल्याण- डोंबिवली अशा मार्गावर ही फेरी बोट खाडीतून मार्ग काढणार आहे. राणे यांच्या माहितीनूसार या बोट वाहतूकीला २५ मे पर्यंत प्रायोगिक तत्वावर सर्व परवानग्या देण्यात आल्या असून त्याची खातरजमा झाल्यावरच महापौरांच्या हस्ते त्याचा शुभारंभ करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. सुमारे 25 ते 50 रुपये असे भाडे प्रती प्रवासी आकारण्यात येणार असून डोंबिवली माणकोलीसाठी सुमारे १० मिनिटे तर कल्याणसाठी २० मिनिटे लागतील, आगामी काळात मुंब्रा भागातही ही प्रवासी फेरी बोट नेण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले. पावसाळयाच्या दिवसात ही सुविधा बंद असते. या परिसरात आधीही एक बोट कार्यरत असून आता ही नवी दुसरी फेरी बोट प्रवाशांसाठी दाखल झाली आहे. या माहापालिकेला लाभलेल्या खाडी किना-याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा. रस्ता वाहतूकीचा वेळ वाचवावा असे आवाहन मोेरे यांनी केले. आगामी काळात या वाहतूकीला मोठी चालना मिळणार आहे. सध्या प्रतीदिन दिडशेहून अधिक नागरिक फेरी बोटीचा लाभ घेतात, नागरिकांची अधिकाधीक सुविधा व्हावी, वेळ वाचावा यासाठी अशा योजनांना पाठबळ मिळणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डोंबिवलीच्या खाडीतून खासगी प्रवासी फेरीबोटचा शुभारंभ
By अनिकेत घमंडी | Published: May 12, 2018 11:54 AM
कल्याण-डोंबिवली महापालिकेला लाभलेला विस्तिर्ण खाडी किना-याचा लाभ जलवाहतूकीसाठी प्राधान्याने व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करण्यात येणार आहेत. डोंबिवलीच्या पश्चिमेतून जुन्या डोंबिवली परिसरातून जलवाहतूक करणा-या खासगी बोटीचा शुभारंभ महापौर विनिता राणे यांनी शनिवारी केला.
ठळक मुद्दे महापौर विनिता राणेंची केले उद्घाटन खाडीकिना-यांच्या विकासावर भर