लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: मालकाने कामाचा मोबादला उशिराने तोही कमी दिल्यामुळे लल्लन उर्फ अनिल विश्वकर्मा (४०, रा. साईनगर, घोडबंदर रोड, ठाणे) याने सात वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याच गुन्हयामध्ये आरोपी असलेला मालक तथा वकील सिबी जेकब इप्पन याला सोमवारी ठाण्याचे सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.घोडबंदर रोडवरील साईनगर येथे राहणारे लल्लन हे ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर असलेल्या देवदया पार्क येथे राहणारे सिबी यांच्याकडे २० वर्षांपासून रंगारी म्हणून कामाला होते. सिबी यांनी त्यांचा वेळेवर पूर्ण पगार दिला नाही. यातूनच मानसिक त्रास झाल्याने सिबी यांच्या साईनगर येथील फॅमिली हायस्कूलजवळ १८ मार्च २०१३ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांनी तणावातून शेडच्या छताला रबरी वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी लल्लन यांची पत्नी निशा विश्वकर्मा (३५) यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात सिबी याच्याविरुद्ध पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी सिबी यानेही ६ एप्रिल २०१३ रोजी अटकपूर्व जामीन मिळविला होता. त्यामुळे २४ एप्रिल २०१३ रोजी त्याला कासारवडवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. या घटनेच्या वेळी चौकशीमध्ये लल्लन याने लिहिलेल्या दोन चिठ्ठयाही पोलिसांनी जप्त केल्या होत्या. सर्व बाजूंची पडताळणी तसेच साक्षीदार तपासल्यानंतर न्या. एस. एस. तांबे यांनी आरोपी सिबी याला १२ जानेवारी २०२१ रोजी तीन वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एच. मुरकुटे यांनी या प्रकरणाचा तपास केला. तर अॅड. वर्षा चंदने यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले.शिक्षा ऐकल्यानंतर आरोपी झाला भावनावशशिक्षेबद्दल आपल्याला काय म्हणायचे आहे, असे न्यायालयाने विचारल्यानंतर आरोपी सिबी म्हणाले, आय एम स्पीचलेस. त्यांनंतर त्यांने भावनाविवश होत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली.
कामगाराला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वकीलाला तीन वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:55 PM
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मालकाने कामाचा मोबादला उशिराने तोही कमी दिल्यामुळे लल्लन उर्फ अनिल विश्वकर्मा (४०, रा. साईनगर, ...
ठळक मुद्देठाणे न्यायालयाचा निर्णयघोडबंदर रोड येथील सात वर्षांपूर्वीची घटना