शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

‘सूर्या’च्या पाण्यासाठी नेते एकवटले

By admin | Published: April 14, 2017 3:04 AM

सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्रा बाहेर वळविल्याने शेतकरी व भूमीपुत्रावर झालेला अन्याय दूर करण्याचा दृष्टीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पालघर, डहाणू, विक्र मगड

पालघर : सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्रा बाहेर वळविल्याने शेतकरी व भूमीपुत्रावर झालेला अन्याय दूर करण्याचा दृष्टीने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी पालघर, डहाणू, विक्र मगड, तालुक्यातील सभापती, नगराध्यक्ष, जिप सदस्य, प.स सदस्य, सरपंच आदींची सभा सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीने १७ एप्रिल रोजी दादोबा ठाकूर सभागृहात आयोजित केली आहे.सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी, कावडास धरणाच्या एकूण २९९.०१ पाणी साठ्या पैकी १८२.८३ दलघमी इतके पाणी वसई-विरार व मिरा-भार्इंदर तसेच मुंबई प्राधिकरना कडे वळविण्यात आले आहे. हा प्रकल्प शेतीच्या सिंचनासाठी उभारण्यात आला व यासाठी हजारो कोटींचा खर्च आजवर करण्यात आला आहे. मात्र , २९९.०१ दलघमी पाणी साठ्यापैकी आजवर २२६.९३ दलघमी इतके पाणी बिगर सिंचनासाठी आरक्षित करण्यात आले असून यातील १८२.८३ दलघमी इतके पाणी वसई-विरार, मिरा-भार्इंदर साठी आरक्षित करण्यात आले आहे. वसईला आधी तात्पुरत्या स्वरूपात सन २००७ पर्यंत हे पाणी देण्यात आले होते. वर्ष २००७ नंतर वसई-विरार महानगर पालिका स्वत:च्या पाण्यासाठीचे स्तोत्र निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, नागरीकरणाच्या रेट्यात माठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहू लागल्याने वसईकरांची पाण्याची हाव वाढत गेली आणि राजकीय डाव खेळत त्यांनी अधिक पाणी पळविल्याचे सूर्य बचाव संघर्ष समितीचे म्हणणे आहे. त्यातच हे पाणी पुढे मिरा-भार्इंदरला देऊन इथल्या नागरिकांना मात्र शासनाने तहानलेले ठेवले आहे.सूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्राबाहेर वळविल्याने प्रकल्प क्षेत्रातील आदिवासी व शेतकऱ्यासमोर मोठे प्रकल्प उभे राहणार असून पालघर ग्रामीण जिल्ह्याच्या विकासावर यापुढे मोठे प्रश्न चिन्ह निर्माण होणार आहे. या पाशर््व भूमीवर ह्या अन्याया विरु द्ध आवाज उठविणे गरजेचे असून ह्या संबंधातील सत्य समजून घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली आहे. ह्यावेळी खासदार चिंतामण वणगा, आमदार अमित घोडा, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, आनंद ठाकूर ई. मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याचे सूर्य पाणी बचाव संघर्ष समितीने कळविले आहे.वरील तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने सर्वच पक्षाचे नेते व पदाधिकारी आपले राजकिय हेवेदावे विसरुन एकत्र येण्याने ठरवले आहे. तसचे ग्रामिण भागाचे त्याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)१९ हजार एकर शेतीला पाणी मिळणार नाहीसूर्या प्रकल्पाचे पाणी प्रकल्प क्षेत्राबाहेर नेल्याने प्रकल्प क्षेत्रातील १९ हजार एकर शेतीला आता पाणी मिळणार नाही. इतकेच नव्हे तर प्रकल्प क्षेत्रातील तहानलेल्या गावांनाही या प्रकल्पातून या पुढे पाणी मिळणार नाही. या पुढे जाऊन जिल्हा मुख्यालय व प्रस्तावित सिडको, नवनगरसाठी पाणी कुठून उपलब्ध होणार हा देखील एक प्रश्न आहे.