लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : शनिवारी रात्री सुरु झालेल्या पावसाने ठाणे शहराला चांगलेच झोडपून काढले. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वंदना, राममारूती रोडसह कोपरी, दिवा आदी ६१ सखल भाग जलमय झाले झाले, तर ३३ वृक्ष उन्मळून पडले. एका ठिकाणी भिंत पडली. मुंब्य्रात विजेचा धक्का लागून एका म्हशीचा मृत्यू झाला. ठाणे, कळवा, मुंब्रा या रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी तुंबल्याने सकाळच्या सुमारास धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ठाण्यात गेल्या चोवीस तासात ३००.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर रविवारी सकाळपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत शहरात ३७.५० मिमी पाऊस पडला. आतापर्यंत एकूण ४८२.५० मिमी पावसाची नोंद झाली.येथे तुंबले पाणीचरई, साठेवाडी, आराधना टॉकीज, कळवा शास्त्रीनगर, सह्याद्री सोसायटी, मुंब्रा दत्तवाडी, दाभोळकरवाडी, हरिदासनगर, अल्मेडा रोड, महागिरी कोळीवाडा, सागरदीप सोसायटी, खारेगाव आझाद चौक, लुईसवाडी, कोपरी-सिद्धार्थनगर, विटावा, माजीवडा साईनाथनगर, गोकुळदासवाडी, जोशीवाडा, गावदेवी मंिदर-कळवा, रामचंद्रनगर-९, शुभंकरोती सोसायटी भास्कर कॉलनी आदी भागात पाणी तुंबले होते. झाडे पडलेली ठिकाणेदवा, दातिवली गाव, बाळकुम लोकपुरम, अभयनगर, कळवा-मुंब्रा रोड, नवपाडा स्टेट बँक समोर, गोडबोले हॉस्पिटल, अनमोल हाईटच्या गेटवर, दत्त मंदिर कल्याण-शिळफाटा, गोकुळनगर, कळवा-मनीषानगर, पारसिकनगर खारेगाव, पोखरण रोड नंबर २, बी-केबीन, चेंदणी कोळीवाडा, फ्लॉवर व्हॅली गेट, वसंतविहार, खारेगाव तलाव गार्डन आदी ठिकाणी झाडे उन्मळून पडली.तासभर रेल्वे विस्कळीत कळवा पूर्व येथे डोंगरातून येणाऱ्या नाल्याचे पाणी रेल्वे रु ळावर आल्याने स्टेशन परिसरात पाणी तुंबले. त्याचा रेल्वे वाहतुकीला फटका बसला. ठाणे रेल्वे स्थानक, मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील नालेसफाईच वेळेवर झाली नसल्याने ठाणे रेल्वे स्थानकातील रु ळावर पाणी आले आहे. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक तासभर विस्कळीत झाली होती. ही वाहतूक ठाणे ते डोंबिवलीदरम्यान जलद मार्गावरून फिरवल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
दिव्यात चाळी पाण्याखाली
By admin | Published: June 26, 2017 1:30 AM