उल्हासनगर : टेडी बेअर डेचे औचित्य साधून शहर वाहतूक विभागाने शिवाजी चौकासह इतर चौकात वाहन नियमाचे धडे टेडी बेअर रुपात पोलिसांनी नागरिकांना दिले. वाहतूक विभागाच्या विविध उपक्रमाची चर्चा शहरात होत असून रस्ता सुरक्षा महिना विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे.
उल्हासनगर वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा महिन्याच्या चौथ्या टप्प्यात टेड़ी बेयर दिवसा निमित्त वाहनचालकांना वाहन नियमाचे धडे टेडी बेअरच्या ड्रेस मध्ये पोलिसांनी दिले. यावेळी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी, महापालिकेचे सहायक आयुक्त अनिल खतूरानी, वान्या फाउंडेशनचे पदाधिकारी, कॉलेज के छात्र व आरएसपी उल्हासनगर युनिटचे कर्मचारी उपस्थित होते.
शहरातील शिवाजी महाराज चौक, फर्नीचर बाज़ार, नेहरू चौक से सिरु चौक दरम्यान असलेल्या वाहनचालक आणि दुकानदाना रस्ता सुरक्षेचे महत्व समजावून सांगितले. सिंधु एजुकेशन सोसायटीच्या पदाधिकारी व माजी नगरसेवक रेखा ठाकुर यांनी सहकार्याच्या मदतीने परिसरात जनजागृती अभियान रैली काढली.