ठाणे : जिल्ह्यातील पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारली आहे. अधूनमधून रिमझिम पडणार्या पावसाच्या जाेरावर जिल्ह्यातील भात पिकांची जाेमाने वाढ हाेत आहे. मात्र त्यावर खाेड कीडा प्रादुभार्वर हाेण्याची दाट शक्यता आहे. त्यावर वेळीच मात करण्यासाठी कृषी खात्याकडून शेती शाळांचे आयाेजन जिल्ह्यातील गांवखेड्यात सध्या करण्यात ये आहे. त्यात प्रामुख्याने खाेड कीड संपवणार्या लघू अभ्यासाचे धडे शेतकर्यांना दिेले जात असलयाचे वास्तव जिल्हा कृषी अधीक्षक दीपक कुटे यांनी लाेकमतला सांगितले.
या खाेड कीड प्रादूर्भ ीवची ओखळ करून देण्यासाठी प्रथम ‘खोडकिडा ग्रस्त लांबीच्या अभ्यात (काज) करण्याची गरज आहे. यामध्ये खोडकिडा पतंग पिवळसर नारंगी रंगाचा असून मादी पतंगाच्या पंखावर काळा ठिपका असतो. नर पतंगाच्या पंखावर काळा ठिपका नसतो . या खाेड कीडाला नियंत्रणात आण्ण्यासाठी प्रारंभी जमिनीची खोल नांगरट करून जमिन चांगली तापू द्यावी यामुळे खोडकिडीचे कोष मरतात व पक्षी उघडे झालेले खोडकिडयाचे कोष खातात त्यामुळे नियंत्रण होते.
लागवडीच्या वेळी रोपांचे शेंडे खुडावेत भात कापणी करताना जमिनी लगत कापणी करावी यासाठी वैभव विळ्याचा वापर करावा. यांत्रीक पध्दत प्रकाश सापळयांचा वापर करावा सायंकाळी २-३ तास बांधावर प्रकाश सापळे लावावे. कामगंध सापळे वापर - एकरी ८ कामगंध सापळे शेतात लावावे. जैविक पध्दत - ट्रायकोग्रामा जापोनिकमच्या ५० हजार अंडयाचा प्रति १ हेक्टरी पिकवाढीच्या अवस्थेत वापर करावा, असे मार्गदर्शन शेतकर्यांना या शेती शाळेत दिले जात आहे.
रासायनिक नियंत्रण -कारटॅप हायड्रोक्लोराईड ४ टक्के दाणेदार १८८ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रोनीलीपोल ० ४ टक्के दाणेदार ९०० ग्रॅम किंवा फिप्रोनिल ०.३ टक्के दाणेदार २०८ ग्रॅम प्रतिगुंठा याप्रमाणात जमिनीत पुरेसा ओलावा असताना द्यावे आदी धडे जिल्ह्यातील बळीराजाला दिले जात आहे.