ठाणे : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना अंतर्गत आय टी आय, कोपरी , ठाणे येथे विद्यार्थिनींसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यशाळा घेऊन त्यांना राेजगार प्राप्तीचे शुक्रवारी अत्याधुनिक धडे देण्यात आले.
स्वयंरोजगार निर्मिती आणि जन जागृती साठी, गतिमानता पंधरवडा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत पार पडणाऱ्या पंधरवाड्यात राज्य शासनाच्या सहकार्याने तरूण, तरूणींना उद्योजक बनविण्यासाठी सुवर्ण संधी मिळण्यासाठी कार्यक्रम जिल्हा उद्याेग केंद्राच्या महाव्यवस्थापक जिल्हा सीमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, आयोजित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोपरी , ठाणे येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत उद्योग अधिकारी सचिन मेमाने, उद्योग अधिकारी अक्षय साळुंके यांनी महाराष्ट्रातील युवक व युवतींनी केवळ नोकरी हा उद्देश न ठेवता उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहावे आणि नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे या साठी महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग व जिल्हा उद्योग केंद्र ठाणे नेहमीच प्रयत्नशील राहील असे आश्वासित केले. कार्यशाळेत ८४ विद्यार्थीनी उपस्थित होत्या. या कार्यशाळेत उद्योग निरीक्षक विकास आव्हाड , यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेबद्दल विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले. प्राचार्य स्मिता पुणतांबेकर, यांनी कार्यशाळा आयोजित केल्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्र ठाणे यांचे काैतूक केले.