ठाणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बाल संरक्षण, महिलांची सुरक्षा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आदींचे कायद्याचे धडे महिलांसह सामाजिक कार्यकत्रे, पोलीस यंत्रणा आदीनी घेतले. येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने ठाणेसह बदलापूरपोलिस ठाण्याच्या सभागृहात हे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन समाजात महिला सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती करून महिलाना ताकद दिली आहे.
बाल संरक्षण, महिलांची सुरक्षा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आदीं विषयींचे प्रशिक्षण ठाणोसह कुळगाव - बदलापूर शहरी, ग्रामीण पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा महिला बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या नियंत्रणात हा एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.जागतीक महिला दिनामुळे या प्रशिक्षणास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या एकदिवसीय प्रशिक्षणात जिल्हा बाल संरक्षण कक्ष, ग्रामीण व वॉर्ड बालसंरक्षण समिती, वन स्टॉप सेंटर, घरगुती हिंसाचार कायदा या विषयांचे मार्गदर्शन करण्यात आले.
या एकदिवसीय कार्य शाळेस उपविभागीय पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कुळगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक देशमुख, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सूवर्णा जाधव, प्रताप पाटील,सखी वन स्टॉप सेंटरचे केन्द्र प्रशासक कविता थोरात, महिला संरक्षण अधिकारी भाग्यश्री बछाव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रामकृष्ण रेड्डी, पल्लवी जाधव, रोहिणी शिरसाठ आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत स्थानिक पोलीस स्टेशन अंतर्गत सर्व पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, स्थानिक महिला दक्षता समिती सदस्य, शांतता समिती सदस्य, स्थानिक पोलीस ठाण्यातील कार्यरत पोलीस ठाणो सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस कर्मचारी यांच्या भूमिका व त्यांच्या जबाबदा:या आणि सक्षम कार्य पद्धतीसाठी जिल्हा पातळीवर कार्यरत असलेल्या यंत्रणा आणि स्थानिक पातळीवर कार्यरत यंत्रणा यांचा समन्वय साधून महिला व बालकांच्या बाबत असलेले कायदे आणि अंमलबजावणीसाठी असलेली यंत्रणा या बाबत जाणीव, जागृती व प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला आहे.