ठाणे: जिल्ह्यातील ग्रामीण, दुर्गम भागातील युवती, महिला यांच्यामध्ये ‘मासीक पाळी’ व्यवस्थापनाची गरज लक्षात घेऊन ठाणेजिल्हा परिषदेने त्यासाठी जनजागृती व प्रशिक्षण उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातील गावपाडे, खेडे यांच्यातील महिलां, युवती यांच्यात यशस्वीरित्या राबवण्यासाठी सुमारे ६५ महिलांचे प्रशिक्षक पथक प्रथम तैनात करण्यात आले. तत्पुर्वी या प्रशिक्षकांनी ‘मासिक पाळी’ व्यवस्थापनाचे धडे शनिवारी पार पडलेल्या कार्यशाळेत घेतले.ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘मासिक पाळी’ व्यवस्थापन उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेऊन ठिकठिकाणच्या प्रशिक्षकांना धडे देण्यात आले. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रथम महिला शिक्षिका, थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी छाया शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले.‘ स्त्री’ ही निसर्गाची किमया असून विश्वाची पुनर्निर्मिती करण्याची शक्ती तिच्यात सामावली आहे. यातील ‘मासिक पाळी’ हा पुनर्निर्मितीचा महत्वपूर्ण टप्पा तर आहेच, पण स्त्रीत्व आणि मातृत्व या दोघांचा समन्वय साधणाऱ्या या ‘मासिक पाळी’च्या नैसर्गिक वास्तवाचे व्यवस्थापन करणे हे गरजेचे आहे’, असे भावनिक व महत्वाचे मार्गदर्शन शिसोदे यांनी यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थी महिला प्रशिक्षकांना केले.या कार्यशाळेला जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या शिक्षिका, अंगणवाडी केंद्रांच्या मुख्य सेविका, आरोग्य विभागाच्या आरोग्य सेविका आदी महिला प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी एक पूर्ण दिवसाच्या या प्रशिक्षण कालावधीत मासिक पाळी व्यवस्थापनाचे बारके व महत्व आदींचे मार्गदर्शन ‘मासिक पाळी’ व्यवस्थापनाचे राज्य समन्वयक डॉ. तारूलता धानके, यांनी केले. पाणी व स्वच्छता मिशन विभागाच्या प्रमिला सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचालन करून महिला प्रशिक्षकांना खेळते ठेवले.
ठाणे जिल्ह्यातील ६५ महिला प्रशिक्षकांनी ‘मासिक पाळी’ व्यवस्थापनाचे घेतले धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 3:39 PM
ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागातील स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘मासिक पाळी’ व्यवस्थापन उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यशाळा घेऊन ठिकठिकाणच्या प्रशिक्षकांना धडे देण्यात आले.
ठळक मुद्दे६५ महिलांचे प्रशिक्षक पथक प्रथम तैनात करण्यात आले युवती, महिला यांच्यामध्ये ‘मासीक पाळी’ व्यवस्थापनाची गरजउपक्रमाला जिल्ह्यातील गावपाडे, खेडे यांच्यातील महिलां, युवती यांच्यात यशस्वीरित्या राबवण्यासाठी