ठाणे : *शिवसेवा मित्र मंडळ ठाणे, पूर्व तर्फे* राजेंद्रपाल मंगला हिंदी हायस्कूल, ठाणे पूर्व. येथे प्रा. श्याम धुरी यांच्या मार्गदर्शनाखाली, *"आता आकाशकंदील बनवा आणी पणती रंगवा घरच्या घरी" या संकल्पनेअंतर्गत "दीपावली आकाशकंदील व पणती पेंटींग" या दीपावली विशेष कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत अबालवृद्धांनी आकाशकंदील पणती पेंटींगचे धडे घेतले. विशेष म्हणजे ७२ वर्षांच्या आजीबाईही यात सहभागी झाल्या होत्या.
मंडळातर्फे गेली ४ वर्ष ही कार्यशाळा घेण्यात येत आहे, या कार्यशाळेत एकूण १०७ आबालवृद्ध सहभाग झाले होते, यामध्ये कलात्मक कंदील बनविण्याचे आणि वैविध्यपूर्ण पणती रंगविण्याचे मार्गदर्शन प्रा. धुरी यांनी केले. पाच वर्षांपासून ७२ वर्षांपर्यंतच्या आजी यात सहभागी झाल्या होत्या. आपण स्वतः केलेले आकाशकंदील व आपण रंगवलेल्या पणत्या घरात लावून यंदाची दीपावली साजरी करण्याचा आनंद उपस्थित मुलांसह पालकांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. या कार्यक्रमात मंडळाचे अथलेटिक्स प्रशिक्षक सत्यराजन मुदलियार यांना तसेच प्रा. धुरी याना यंदाचा ठाणे महानगरपालिकेचा ठाणे गुणिजन पुरस्कार २०१८ मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेला दूरदर्शन मालिका कलाकार विकास थोरात उपस्थित होते, तसेच जेष्ठ रांगोळीकार महेश कोळी, चित्रकार देसाई, निशा दांडेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अध्यक्ष अजय नाईक केले, सर्व उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कंदील बनवणे पणत्या रंगवणे आवड होती इच्छाही होती, पण कामाच्या आणि संसाराच्या रंगाड्यात हे सर्व करायला वेळच मिळाला नाही शिवसेवाच्या ह्या कार्यशाळे मुळे मी खूप वर्षांनी आकाशकंदील आणि पणत्या रंगवण्याची माझी हौस पुरी झाली, पुढेही या कार्यशाळेत सहभागी होणार असे मत आजीबाईंनी व्यक्त केले.