हेवेदावे विसरून काँग्रेस पक्षाला द्या बळकटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:52 AM2018-10-02T04:52:40+5:302018-10-02T04:53:07+5:30

बी.एम. संदीप : डोंबिवलीत पक्षाचा मेळावा, सत्ताधारी भाजपावर केली टीका

Let Congress forget to forget this hegemony; | हेवेदावे विसरून काँग्रेस पक्षाला द्या बळकटी

हेवेदावे विसरून काँग्रेस पक्षाला द्या बळकटी

Next

डोंबिवली : आपापसांतील हेवेदावे कमी करून काँग्रेसला बळकटी मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. सत्ता मिळवण्यासाठी सर्वांनी मन लावून काम करावे, असे आवाहन पक्षाचे सचिव बी.एम. संदीप यांनी डोंबिवलीत केले. काँग्रेसच्या शक्ती अ‍ॅपची माहिती कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देण्यासाठी पक्षातर्फे शनिवारी पूर्वेतील सर्वेश सभागृहात मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख पदाधिकाºयांची बैठकही झाली. याप्रसंगी पक्षाचे निरीक्षक राजेश शर्मा, राजन भोसले आदी उपस्थित होते.

संदीप पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकार हे भ्रष्टाचारी आहे. चार वर्षांत त्यांनी विशेष काहीच केले नाही. आधारकार्ड तसेच अन्य योजनाही काँग्रेस सरकारच्या काळातील आहेत. भाजपाने विजय मल्ल्या, नीरव मोदी आदींना मोठे केले. राफेल घोटाळा हा देखील त्याचेच एक उदाहरण आहे. नागरिकांनी सरकारच्या भूलथापांना बळी पडू नये. तसेच पक्षांतर्गत गटबाजी, दुफळी, हेवेदावे असता कामा नयेत. कार्यकर्त्यांनी, पदाधिकाºयांनी एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.
काँग्रेसचे केडीएमसीतील गटनेते नंदू म्हात्रे, पप्पू भोईर, नगरसेविका हर्षदा भोईर, माजी नगरसेवक नवीन सिंग, सचिन पोटे, संतोष केणे, रवी पाटील, अमित म्हात्रे, कांचन कुलकर्णी, राहुल काटकर, गंगाराम शेलार, एकनाथ म्हात्रे, शारदा पाटील, वर्षा गुजर, दीप्ती जोशी, वर्षा शिखरे, मीना सिंग, सदाशिव शेलार, दर्शना शेलार उपस्थित होते.

शक्ती अ‍ॅप नागरिकांपर्यंत पोहोचवावे
च्शक्ती अ‍ॅप कार्यकर्त्यांनी नागरिकांपर्यंत पोहोचवावे. काँग्रेसने देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाची माहिती द्यावी. अ‍ॅपद्वारे नागरिकांना थेट पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.
च्गांधी हे नागरिकांकडून समस्या आणि अपेक्षा जाणून घेणार आहेत. तसेच ते बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करतील. त्यामुळे जास्तीतजास्त नागरिकांना अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगावे. तसेच काँग्रेसला मत देण्याचे आवाहन करावे, असे सांगण्यात आले.

Web Title: Let Congress forget to forget this hegemony;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.