ठाणे : ते विरोधक आहेत त्यांना त्याचे काम करू द्या आम्ही आमचे काम करत आहोत अशी टीका राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेत्यांवर केली. ठाण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेता आदित्य ठाकरे ठाण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र फाटक,महापौर नरेश म्हस्के, ठाणे पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांच्यात बैठक झाली. वाढता कोरोना रोखण्यासाठी पालिका प्रशासन योग्य ती पाऊले उचलत असून ठाणेकर नागरिकांनी देखील काळजी घेतली पाहिजे. तसेच पुन्हा करण्यात आलेल्या लॉकडाऊन संदर्भात गंभीरपणे नागरिकांनी विचार करून काम असेल तरच घराबाहेर पडा असे देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ठाण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज ठाणे परिसरात अनेक रुग्ण वाढत असून ही साखळी आपल्याला रोखायचे असेल तर नागरिकांना घरीच राहावे लागेल. ठाणेकर नागरिकांनी घाबरू न जाता कोरोनाशी दोन हात करण्यासाठी तयार रहा असे सांगत ठाणेकरांनी घाबरू नये मात्र काळजी घ्यावी असा सल्ला आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिला.
प्रामुख्याने ठाण्यात रुग्ण कसे कमी होतील याकडे प्रशासनासाचे लक्ष आहे. यासाठी लागणाऱ्या यंत्रणा,सामुग्री पुरवण्यात येत आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेत असून लवकरात लवकर कोरोना कसा हद्दपार करता येईल यासाठी सरकार आणि पालिका प्रशासन पर्येंत करीत आहेत. नागरिकांनी देखील सहकार्य करावे अशी अपेक्षा यावेळी ठाकरे यांनी व्यक्त केली.
आपण कोरोनाला कंटाळलो आहे कोरोना आपल्याला नाही - आदित्य ठाकरे
ठाण्यातच नव्हे तर राज्यात आणि देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक उद्योग धंदे बंद आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून नागरिक घरी आहेत. त्यामुळे आपण जरी कोरोनाला कंटाळलेलो असलो तरी मात्र कोरोना आपल्याला कंटाळलेला नाही असे सांगत नागरिकांनी घरीच राहून प्रशासनाला, राज्य सरकारला सहकार्य करावे असे यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सांगितले.