ठाणे - मागील वर्षी सरासरी पेक्षा यंदा देखील त्याच स्वरुपात पाऊस झाला असला तरी देखील उन्हाच्या झळा सोसाव्या लागण्या आधीच ठाण्यावर पाणी कपातीचे संकट ओढावण्यास सुरवात झाली आहे. त्यानुसार आता शुक्रवार पासून दर १५ दिवसांनी शहरातील कळवा आणि मुंब्रा भागातील पाणी पुरवठा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. पाणी कपातीची पहिली कुºहाड एमआयडीसीने उगारल्यानंतर आता १० तारखेनंतर स्टेम देखील पाणी कपातीचा निर्णय घेणार आहे. त्यानुसार शहरी भागाला देखील पाणी कपातीच्या झळा सहन कराव्या लागणार असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील उपलब्ध पाणी साठयाच्या नियोजनाबाबत कार्यकारी अभियंता, लघुपाटबंधारे विभाग यांनी कळविले असल्याने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणी पुरवठा शुक्र वार ५ जानेवारी, पासून यापुढे दर १५ दिवसांनी म्हणजेच गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या कालावधीत कळवा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रु पादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र .१ (एम. आय. डी. सी. कडून होणारा पाणी पुरवठा) आदी ठिकाणचा पाणी पुरवठा २४ तास पुर्ण बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असून, नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करुन पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने या प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.दरम्यान, कळवा, मुंब्य्राला पाणी कपातीचा पहिला फटका बसल्यानंतर पुढील आठवड्यापासून ठाणे शहराला देखील पाणी कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. शहराला पाणी पुरवठा करणाºया स्टेमने देखील १० जानेवारी नंतर पाणी कपात लागू करण्याचे निश्चित केल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्टेमकडून होणारा ११० एमएलडी पाणी पुरवठा हा १५ दिवसातून एकदा बंद राहणार आहे. कळवा, मुंब्रा वगळता ठाणे शहराला आजच्या घडीला ३७० एमएलडी पाणी पुरवठा होत आहे. यातील २५० एमएलडी पाणी पुरवठा हा ठाणे महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून करीत आहे. त्यामुळे स्टेमने जरी पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला असला तरी शहरातील भागांना ३७० पैकी केवळ ११० एमएलडी पाणी कमी होणार आहे. परंतु महापालिका स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करणार असल्याने त्याचा फारसा परिणाम ठाणेकरांना जाणवणार नसल्याचे पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.
कळवा, मुंब्य्रातून पाणी कपातीस सुरवात, महिन्यातून दोनदा शटडाऊन, शहरी भागालाही पुढील आठवड्यापासून पाणी कपात लागू होण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2018 5:31 PM
उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच ठाण्यावर देखील पाणी कपातीचे संकट कोसळले आहे. शुक्रवार पासून कळवा, मुंब्रा भागातून पाणी कपातीला सुरवात झाली आहे. तर पुढील आठवड्यात ठाणे शहराला पाणी कपातीचा सामना करावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
ठळक मुद्देपाणी कपातीची पहिली कुऱ्हाड कळवा, मुंब्य्रावरपुढील आठवड्यात ठाण्यातही सुरु होणार पाणी कपात