ठाणे : गणेशोत्सव मंडळांची बैठक संपन्न झाल्यानंतर ठाणे जिल्हा गणेशोत्सव समितीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व त्यांच्यासोबत चर्चा करून प्रमुख तीन मुद्दे मांडले. यावर राज्य शासनासोबत चर्चा करून लवकरच तोडगा काढू, असे आश्वासन समितीला दिले.
गणेशमूर्तीवरील उंचीची बंधने हटवावीत, कोरोनाचे नियम पाळून आगमन, विसर्जन मिरवणुकीसाठी परवानगी द्यावी, गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांचे लवकरात लवकर लसीकरण होईल अशी योजना आखावी, हे तीन मुद्दे शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत समितीने मांडले. तसे निवेदनही त्यांना दिले. राज्य सरकारशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे शिंदे म्हणाले. १० सप्टेंबर रोजी गणेशोत्सवास सुरुवात असल्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी समितीने केली. यावेळी समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांच्यासह प्रशांत शेवाळे, विशाल सिंह , किरण जाधव, प्रवीण, तुषार पेठकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
-----------
फोटो मेलवर
............
वाचली