डोंबिवली : केडीएमसी असो अथवा अन्य प्राधिकरणांकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही ठोस कृती होत नसल्यामुळे एमआयडीसी-निवासी भागातील रहिवाशांकडून आता आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या माध्यमातून संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले जाणार आहे. येथील सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांना पत्रव्यवहार करायला सुरुवात केली असून यानंतर तरी कार्यवाही होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
१ जून २०१५ ला २७ गावांचा केडीएमसीत समावेश झाला. परंतु, या गावांचा एक भाग असलेल्या एमआयडीसीतील निवासी भागातील समस्या कायम आहेत. खड्डेमय रस्ते, धुळीचा त्रास, कचरा वेळेवर न उचलला जाणे, वाढीव मालमत्ताकर या समस्यांबाबत वारंवार केडीएमसीकडे पत्रव्यवहार करूनही कोणतीही योग्य कार्यवाही होत नसल्याने रहिवासी त्रस्त आहेत. आयुक्त गोविंद बोडके यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतरही येथील परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही.
आ. पाटील यांनीही विधानसभा निवडणुकीनंतर निवासी भागाला भेट देऊन तेथील रहिवाशांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यामुळे येथील समस्या त्यांच्या माध्यमातून निराकरण करण्यासाठी सोसायट्यांनी पत्रप्रपंचाचा आधार घेतला आहे. रहिवाशांच्या समस्या या केवळ केडीएमसीशी निगडित नसून वाहतूक आणि महावितरण विभागाशीही निगडित आहेत. निवासी भागातील गुरुराज सोसायटीने आ. पाटील यांना केलेल्या पत्रव्यवहारात बेकायदा टपºया, बेशिस्त व बेकायदा पार्किंग, झाडांच्या वाढलेल्या फांद्या, गटारेआणि रस्त्यांची दुर्दशा, धूळधाण, डेब्रिज या समस्यांकडे लक्ष वेधले आहे. निवासी भागातील अनेक सोसायट्या आमदारांना पत्रव्यवहार करणार असल्याची माहिती मनसेचे पदाधिकारी नंदकिशोर ठोसर यांनी ‘लोकमत’ला दिली.पालिकेकडून दुर्लक्षच्एमआयडीसी परिसरात राहणाºया नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. धूळ, खराब रस्ते या समस्या ‘जैसे थे’ पालिकेचे दुर्लक्ष होत आहे.