शाम धुमाळ
रात्रभर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज पहाटे आटगाव रेल्वे स्थानकाच्या पुढे रेल्वे ट्रकवर झाड पडल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक 2 तासाहून अधिक काळ ठप्प होती. सकाळी 8 वाजता रेल्वे ट्रॅकवरील झाड व मातीचा मलबा काढण्यात आल्यानंतर कसाऱ्याकडे वाहतूक लोकल सेवा व मागे अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या कसाऱ्याकडे सोडण्यात आल्या. मात्र 3 तासांने सुरू झालेली रेल्वे सेवा लगेचच 15 मिनिटांनी पुन्हा बंद झाली.
वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हार हेड वायरचा पोल खचल्याने रेल्वेचा ओव्हरहेड वीज पुरवठा बंद झाला व परिणामी वांसिदहून कसाराकडे जाणारी व कसाराहून मुंबई कडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनिश्चित काळासाठी रेल्वे सेवा बंद झाल्याची अनाउसमेंट रेल्वेकडून करण्यात येत होती. दरम्यान यामुळे टिटवाळा ते कसारा रेल्वे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गिकेवर मेल एक्सप्रेस, लोकल गाड्या अडकून पडल्या होत्या.
वासिंद जवळ रेल्वेच्या ओव्हर हेड वायरचे पोल खचल्याची माहिती मिळताच कल्याण कसाऱ्यापासून सर्व रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. रेल्वे प्रशासनाने या मार्गांवरील वीज पुरवठा बंद करून खचलेल्या पोलची दुरुस्ती सुरु केली. लटकलेल्या तारा व वाकलेले पोल ठीक करण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांना तब्बल 4 तासाहून अधिक वेळ लागला. दुपारी दीड वाजेच्या दरम्यान कसारा कल्याण रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरु करण्यात आली. आसनगाव,आटगाव्, खर्डी,कसारा दरम्यान अडकलेल्या मेल एक्सप्रेस गाड्या ,वंदे भारत एक्सप्रेस मुंबई रवाना करण्यात आल्या. दरम्यान रात्रभर पडत असलेल्या पावसामुळे कल्याण कसारा रेल्वे मार्ग तब्बल 6 तासानंतर सुरळीत धिम्या गतीने सुरु झाला.
हजारो प्रवाशाचे हालदरम्यान या 6 तासाच्या नैसर्गिक मेघा ब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.रेल्वे प्रवाशासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने कोणतीही मदत, उपयायोजना न केल्याने अडकलेल्या मेल एक्सप्रेस प्रवाशा चे मोटग्या प्रमाणात हाल झाले गाडीतील पेंट्री कार मधील पाणी,नाश्ता सर्व सम्पल्याने लोकांना पाणी पाणी करीत 6 तास लटकावे लागले.