कल्याण/टोकावडे : मुरबाड तालुक्यातील टोकावडे, खापरी येथील जमिनीच्या वादातून १० वर्षांपूर्वी तानाजी राऊत यांची हत्या झाली होती. या खटल्याचा निकाल शनिवारी कल्याण सत्र न्यायालयाने दिला. एकूण १० आरोपींपैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा तर उर्वरित सात आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दाेष मुक्तता झाली.खापरी येथील प्रभाकर शंकर राऊत यांनी गावातील काही शेतकऱ्यांची जमीन त्यांच्या नकळत परस्पर गुजरात येथील व्यक्तीला विकण्याचा घाट घातला होता. या जमिनीपोटी राऊत यांनी बयाणा घेतला. ही बाब गावातील निवृत्त आरोग्य कर्मचारी तानाजी हिरू राऊत यांच्या निदर्शनास येताच त्यांनी सर्व शेतक-यांनी त्याची माहिती दिली. तर आम्ही कोणीही प्रभाकर राऊत यांच्यामार्फत जमीन विकलेली नाही, असे संबंधितांनी तानाजी यांना सांगितले.दरम्यान, सर्व शेतकºयांनी टोकावडे पोलीस ठाण्यात प्रभाकर राऊत यांच्याविरोधात तक्रार दिली. त्या रागातून ग्रा.पं. निवडणुकीच्या दिवशी प्रभाकर राऊत याने त्याचे भाऊ आणि पुतण्यासह तानाजी राऊत यांच्या घरात शिरकाव केला आणि तानाजी यांना रस्त्यावर आणून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांना टोकावडे येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील जे. जे. रु ग्णालयात हलवण्यात आले. परंतु, तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.>१० हजारांचा दंडया खटल्याची सुनावणी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एस. हाथरोटे यांच्या न्यायालयात झाली.या वेळी आरोपी प्रभाकर शंकर राऊत, सुरेश शंकर राऊत व नारायण शंकर राऊत यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच प्रत्येकी १० हजार रु पये दंड ठोठावण्यात आला.दंड न भरल्यास आणखी दोन वर्ष सश्रम कारावास भोगावा लागणार आहे. मात्र, यातील अन्य आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. या खटल्यात सरकारी वकील म्हणून अॅड. रचना भोईर यांनी काम पाहिले.
तीन भावांना जन्मठेप; सात जण निर्दाेष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 3:23 AM