शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मुंब्य्रासह दिव्यालाही मिळणार मुबलक पाणी, पालिकेची १९६ कोटींची रिमॉडेलिंगची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 4:07 PM

मुंब्रा आणि दिव्याची तहान भागविण्यासाठी ठाणे महापालिकेने नव्याने रिमॉडेलिंगची योजना पुढे आणली आहे. त्यानुसार यासाठी १९६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या संदर्भातील प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्दे१० नव्या जलकुंभाची केली जाणार उभारणीमहापालिका आणि एमआयडीसीकडून वाढणार पाणी पुरवठा

ठाणे - ठाणे महापालिकेने घोडबंदरच्या रिमॉडेलिंगचा प्रस्ताव पुढे आणल्यानंतर आता मुंब्य्राचीही तहान याच बेसवर भागविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार येत्या महासभेत या मुंब्य्राच्या रिमॉडेलिंगचा प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आला आहे. यामुळे येत्या काळात मुंब्य्राची तहान भागली जाणार आहे. आता हे काम महापालिका स्वत: करणार असून यासाठी लागणाऱ्या खर्चात मात्र ६९ कोटींनी वाढ झाली आहे. या योजनेत आता दिव्याचाही समावेश करण्यात आल्याने ही वाढ झाल्याचे पालिकेचे म्हणने आहे.                  ठाणे महापालिकेच्या वतीने मुंब्य्रातील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग प्रकल्पाचा अहवाल तयार केला होता. त्यानुसार २०१०-११ मध्ये यासाठी ९७.४१ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. त्यानुसार केंद्राच्या जेएनएनयुआरएम योजनेअंतर्गत हे काम करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु या योजनेसाठी निधी उपलब्ध होऊ शकला नाही. तसेच ही योजना देखील बंद झाली. त्यामुळे ही योजना कशी राबवयाची असा पेच पालिकेपुढे पडला होता. त्यानंतर केंद्राच्या अमृत योजनेतून पालिकेने हे काम करण्याचा पालिकेने विचार केला होता. परंतु अमृत योजनेतून देखील या प्रस्तावाला मान्यता मिळाली नाही. अखेर पालिकेने आता या योजनेसाठी स्वत: खर्च करण्याची तयारी सुरु केली आहे. सध्या मुंब्य्राची लोकसंख्या ही वाढली असून येथे असलेले जलकुंभ हे २०११ पर्यंत पाणी पुरवठा होईल एवढेच होते. परंतु आता त्यात वाढ करणे अपेक्षित असल्याचे पालिकेचे म्हणने आहे. त्यानुसार आता एकूणच येथील पाणी वितरण व्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून यासाठी १२६ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु आता या योजनेत दिव्याचाही पालिकेने समावेश केला आहे. त्यामुळे हा खर्च आता १९६ कोटींच्या घरात गेला आहे. त्यानुसार मुंब्रा व दिवा भागासाठी आता ही रिमॉडेलींगची योजना राबविली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.                         मुंब्रा व दिवा विभागासाठी पाणी पुरवठ्याचे नियोजन हे पायाभूत वर्ष २०१८ धरुन पुढील ३० वर्षांसाठी वहन व्यवस्था व वितरण व्यवस्था गृहीत धरण्यात येणार आहे. जलकुंभ संप व पंप हाऊस १५ वर्ष कालावधीसाठी संकल्पीत करण्यात येतील, या योजनेसाठी महापालिकेची स्वत:ची योजना व एमआयडीसीकडून पाणी उपलब्ध करुन देणार आहे, मुंब्रा दिवा विभागासाठी मुख्य जल संतुलन टाकी बांधण्याचा समावेश करण्यात येणार आहे, नव्याने २०० मी.मी. ते १ हजार मी. मी. व्यासाच्या सुमारे १८ किमी लांबीच्या जलवाहीनी टाकण्यात येणार आहेत. तसेच या कामासाठी सल्लागाराचीही नेमणुक केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत नव्याने १० जलकुंभ बांधले जाणार असून आदी कामांसह इतर कामांचा यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार २०१८-१९ या वर्षात ३० कोटी, २०१९-२० मध्ये ९० कोटी आणि २०२०-२१ या कालावधीत ७६ कोटींचा खर्च केला जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी