शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

डोंबिवली, दिवा स्थानकांत तिकिटासाठी रांगा, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2020 10:49 AM

डोंबिवली : महिलांना ठरावीक वेळेत का होईना लोकल प्रवासाला मुभा मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मोठ्या ...

डोंबिवली :महिलांना ठरावीक वेळेत का होईना लोकल प्रवासाला मुभा मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी मोठ्या प्रमाणावर महिला प्रवासासाठी बाहेर पडल्या. मात्र, अपुऱ्या तिकीटखिडक्यांमुळे डोंबिवली, दिवा स्थानकांतील तिकीटघरांमध्ये सकाळी ११ च्या सुमारास त्यांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, फिजिकल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. 

अनेक महिलांनी बुधवारी पहिल्या दिवशी प्रवास टाळला होता. गुरुवारी त्या घराबाहेर पडल्याने डोंबिवली पश्चिमेला तिकिटाची रांग रेल्वेस्थानकातून थेट महात्मा गांधी रस्त्यावर पोहोचली होती. दिव्यातही पश्चिमेला महिलांच्या रांगा तिकीटघरांमधून रस्त्यावर आल्या होत्या. याबाबत दिव्यात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड. आदेश भगत यांनी माहिती घेतली असता तिकीटखिडक्या पुरेशा प्रमाणात उघड्या नाहीत. स्थानकातील एटीव्हीएम सुविधा बंद असल्याने महिला ताटकळत उभ्या असल्याचे आढळले. जशी वेळ वाढली तशी गर्दीही वाढल्याने महिला त्रस्त झाल्या. जास्तीच्या खिडक्या तातडीने सुरू करण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी रेल्वेच्या वाणिज्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. 

दरम्यान, दुपारी १२ नंतर विशेष तिकीटखिडक्या सुरू झाल्यानंतर गर्दी आटोक्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवासी संघटनेच्या मागणीची दखल घेत विशेष खिडक्या सुरू केल्याबद्दल देशमुख यांनी रेल्वेचे आभार मानले. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महिलांना फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून तिकीट, पास काढावा, असेही आवाहन त्यांनी केले. जनसाधारण तिकीट योजना (जेटीबीएस) सुविधा सुरू केल्यास हा ताण कमी होईल, असेही त्यांनी रेल्वे प्रशासनाला सुचवले आहे.

...लवकरच नियोजन अपेक्षिततिकीट तपासनीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी पहिल्या शिफ्टमधील क्लार्क हे शिफ्ट संपली की, त्यांची अन्य कामे करण्यासाठी तिकीटखिडकी बंद करतात. त्यामुळे कर्मचारी आत असून तिकीटखिडक्या बंद का, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. त्यामुळे गोंधळ वाढतो. अन्य एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या कोरोनामुळे सर्व खिडक्या उघडण्यात येत नाहीत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी गरजेपुरत्याच उघडल्या जात होत्या. आता सर्वच महिलांना प्रवासाला मुभा दिल्याने गर्दी होत आहे. रेल्वे प्रशासन खिडक्या वाढवण्याबाबत लवकरच नियोजन करेल.  

टॅग्स :localलोकलWomenमहिलाrailwayरेल्वे