शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
2
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
3
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
4
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
5
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
6
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
7
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
8
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
9
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
10
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
11
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
12
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
13
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
14
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
15
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
16
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
17
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
18
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
19
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा

भाईंदर पालिका प्रभाग १० च्या पोटनिवडणुकीसाठी २० हजार ७०९ मतदारांची यादी प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 2:38 PM

Mira Bhayander Municipal Corporation by-election : पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सदर प्रभागातील मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता . 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना गटनेते हरिश्चंद्र आमगावकर यांचे ९ जून २०२० रोजी कोरोना मुळे निधन झाल्याने रिक्त झालेल्या भाईंदर पूर्वेच्या प्रभाग १० मधील जागे साठी पोटनिवडणूक होणार आहे . त्या अनुषंगाने महापालिकेने २० हजार ७०९ मतदारांची मतदार यादी प्रसिद्ध केली असून त्यावर हरकत - सुचने साठी २३ फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली आहे . 

भाईंदर पूर्वेच्या प्रभाग १० मध्ये ऑगस्ट २०१७ साली झालेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या तारा घरत , हरिश्चंद्र आमगावकर, स्नेहा पांडे व जयंती पाटील असे चार नगरसेवक निवडून आले होते . परंतु कोरोना काळात प्रभागातील नागरिकांच्या मदतकार्यात सक्रिय असलेल्या आमगावकर यांना कोरोनाची लागण झाली . १३ दिवसांच्या कोरोना सोबतच्या झुंजी नंतर ९ जून रोजी त्यांची प्राणज्योत मालवली . दुसऱ्या दिवशी १० जून रोजी कोरोना मुळे त्यांच्या आईचे सुद्धा निधन झाले . 

आमगावकर यांच्या निधना नंतर शिवसेना गटनेते पदी नीलम ढवण यांची नियुक्ती करण्यात आली . तर प्रभागात रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक लढवण्याची तयारी भाजपाने सुरु केली होती . तर शिवसेने कडून दिवंगत हरिश्चंद्र आमगावकर यांच्या पत्नी पूजा यांना उमेदवारी दिली जाण्याचे निश्चित मानले जाते . पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने सदर प्रभागातील मतदार यादी तयार करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला होता . 

२० हजार ७०९ मतदारांची  मतदार यादी तयार करून  १६ फेब्रुवारी रोजी पालिकेने ती प्रसिद्ध केली . त्या मध्ये ११ हजार ६५३ पुरुष मतदार तर ९ हजार ५५ महिला मतदार आहेत . १ अन्य मतदार आहे . सदर यादी पालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे . तसेच पालिका मुख्यालय व प्रभाग कार्यालयात सुद्धा ठेवली आहे . २३ फेब्रुवारी पर्यंत मतदार यादीतील मतदार माहिती बाबत हरकत - सूचना  घेता येणार आहे . ३ मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे . ८ मार्च रोजी मतदार केंद्रांची माहिती प्रसिद्ध केली जाईल . तर १२ मार्च रोजी अंतिम मतदार यादी मतदान केंद्र निहाय यादी प्रसिद्ध केली जाणार आहे .  

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकElectionनिवडणूक