शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

स्थायी सदस्यांची यादी जाहीर

By admin | Published: March 02, 2016 1:50 AM

मागील महासभेत स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम होत नसल्याने सभा तहकूब करणाऱ्या शिवसेनेने अखेर सोमवारी झालेल्या महासभेतदेखील तब्बल दोन तास

ठाणे : मागील महासभेत स्थायी समिती सदस्यांची नावे अंतिम होत नसल्याने सभा तहकूब करणाऱ्या शिवसेनेने अखेर सोमवारी झालेल्या महासभेतदेखील तब्बल दोन तास खलबते केल्यानंतर आपल्या सदस्यांची यादी जाहीर केली. त्यानुसार, निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची नियुक्ती पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केली. विशेष म्हणजे शिवसेनेने एक अनुभवी पदाधिकारी दिला असून भाजपाचे संजय वाघुले यांची पुन्हा स्थायीत वर्णी लागली आहे. त्यामुळेच आता शिवसेना भाजपाला दिलेला शब्द पाळणार, हे निश्चित मानले जात आहे.स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के यांच्यासह रिपाइंचे रामभाऊ तायडे, सुधीर भगत, राधाफतेबहादूर सिंह, मिलिंद पाटील, सिराज महमद अली डोंगरे, दीपक वेतकर आणि भाजपाचे संजय वाघुले यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी नव्या आठ सदस्यांची निवड केली गेली आहे. २० फेबु्रवारी रोजी झालेल्या महासभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपली नावे पीठासीन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली होती. परंतु, शिवसेनेमध्ये काही नावांवरून मतभेद राहिल्याने अखेर उपायुक्तांना झालेल्या मारहाणीचा निषेध करून ही महासभाच पूर्णवेळेसाठी तहकूब केली होती.दरम्यान, सोमवारीसुद्धा दुपारी २ वाजता महासभा सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, शिवसेनेत नावावरून मतभेद झाल्याने ही यादी लांबणीवर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अखेर, १५ मिनिटांसाठी महासभा तहकूब करून त्यानंतर सुरू झालेल्या सभेत शिवसेनेच्या नावांवर एकमत झाले. त्यानुसार, शिवसेनेतून ज्येष्ठ नगरसेवक विलास सामंत, दशरथ पालांडे, उमेश पाटील आणि संभाजी पंडित यांची नावे जाहीर झाली. तर, भाजपामधून संजय वाघुले यांची पुन्हा निवड झाली. तसेच राष्ट्रवादीकडून सुहास देसाई आणि प्रमिला केणी आणि काँग्रेसकडून यासीन कुरेशी यांची नावे जाहीर करण्यात आली.सुरुवातीला सेना भाजपाला स्थायी समिती सोडणार नसल्याचा गवगवा केला गेला होता. परंतु, अखेर शिवसेनेने दिलेला शब्द पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शेवटच्या वर्षी स्थायीच्या चाव्या भाजपाच्या वाटेला येणार आहेत.