शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

ऐका ठाणेकरांच्या खुलभर दुधाची कहाणी

By admin | Published: February 26, 2017 2:29 AM

ऐका ठाणेकरांनो तुमची कहाणी... आटपाट नगर नव्हे तर सुशिक्षितांच्या, सुसंस्कृतांच्या, डोळस श्रद्धाळूंच्या, सांस्कृतिक ठाण्यात महाशिवरात्रीनिमित्त शिवपिंडीवर श्रद्धेपोटी वाहिले

ठाणे : ऐका ठाणेकरांनो तुमची कहाणी... आटपाट नगर नव्हे तर सुशिक्षितांच्या, सुसंस्कृतांच्या, डोळस श्रद्धाळूंच्या, सांस्कृतिक ठाण्यात महाशिवरात्रीनिमित्त शिवपिंडीवर श्रद्धेपोटी वाहिले जाणारे थोडेथोडके नव्हे तर तब्बल १७४ लीटर दूध रोट्रॅक्ट क्लब आॅफ ठाणे ग्रीन सिटीच्या तरुण स्वयंसेवकांच्या प्रयत्नामुळे समाजातील दुर्बल घटकातील मुलांच्या शुक्रवारी पोटात गेले.महाशिवरात्रीला हजारो भाविक ठाण्यातील शिव मंदिरांमध्ये रांगा लावून शिवपिंडीवर दूधाचा अभिषेक करतात. हे दूध गरिबांना, अनाथांना देण्यात यावे याबाबत गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर जनजागृती केली जात आहे. रोट्रॅक्ट क्लब आॅफ ठाणे ग्रीन सिटीच्या तरुण स्वयंसेवकांनी भाविकांकडून दूध गोळा करून ते दुर्बल घटकांपर्यंत पोहचवून समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ठाण्यात श्रद्धेपोटी दुग्धाभिषेक होत असताना आजूबाजूच्या परिसरातील अनाथालये, आदिवासी पाडे येथे मुलांच्या पोटात पुरेसे दूध जात नसल्याने ती भूकेने, कुपोषणाने प्राण सोडत असतात. शिवपिंडीवर अभिषेक केलेले दूध मोठ्या प्रमाणात वाया जाऊ नये आणि ते गरिबांच्या मुखी जावे या उद्देशाने रोट्रॅक्ट क्लब आॅफ मुंबई मुलुंड साऊथ या संस्थेने ‘द व्हाईट रेव्होल्यूशन’ हा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत रोट्रॅक्ट क्लब आॅफ ठाणे ग्रीन सिटीने मागील वर्षापासून ठाण्यामध्ये देखील हा उपक्रम राबवायला सुरुवात केली.ठाण्यातील तरुण हे दूध फक्त गोळा करत नाहीत तर त्यामध्ये साखर आणि वेगवेगळे स्वाद मिसळून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहचवतात. यंदा जास्तीत जास्त दूध गोळा करणे हे ध्येय होते. ठाणे पूर्व येथील शिव मंदिराच्या परिसरात हा उपक्रम राबविला. २४ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत ४० स्वयंसेवक मंदिरांत उपस्थित होते. पिंडीवर एक चमचा दूध भक्ती आणि श्रद्धेसाठी अर्पून उर्वरित दूध गरीब मुलांच्या पोटात जाण्याकरिता द्यावे, असे या तरुणांनी भाविकांना आवाहन केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सूज्ञ ठाणेकरांनी आम्ही शिवपिंडीवरच दुग्धाभिषेक करणार, असा दुराग्रह न बाळगता या आवाहनाला उदंड प्रतिसाद दिला. संस्थेने १७४ लीटर दूध गोळा केले. हा आकडामागील वर्षीच्या दूध संकलनापेक्षा दुप्पट होता. हे दूध पिंपामध्ये गोळा करून थंड करण्यात आले. त्यानंतर आनंद भारती समाज सभागृहामध्ये ते काळजीपूर्वक उकळवून त्याचे मसाला दूध तयार करण्यात आले. (प्रतिनिधी)