नारायण जाधव ठाणे : केंद्राकडून १४ व्या वित्त आयोगाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा १४८९ कोटी ५१ लाखांचा पहिला हप्ता राज्य सरकारने राज्यातील ३८२ स्थानिक संस्थांना वितरीत केला असून यात ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील १४ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वाट्याला १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये आले आहेत.या निधीतून स्थानिक स्वराज्य संस्थांना मूलभूत पायाभूत सुविधांची कामे करता येणार आहेत. त्यात्या शहरांची लोकसंख्या,भौगोलिक क्षेत्रफळ या निकषांच्या आधारे हे अनुदान वितरीत होते. या १४ स्वराज्य संस्थांमध्ये ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील ड वर्ग महापालिकांसह नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा समावेश आहे.>ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर, मीरा-भार्इंदर, भिवंडी या तीन महापालिकांसह अंबरनाथ व बदलापूर नगर परिषद आणि मुरबाड आणि शहापूर नगरपंचायती तर, पालघर जिल्ह्यातील जव्हार, डहाणू, पालघर नगर परिषदांसह विक्रमगड, तलासरी, वाडा, मोखाडा या नगरपंचायतींना हे १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७० रुपये अनुदान मिळणार आहे.>शासनाने असे केले अनुदानाचे वाटपस्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव अनुदानाची रक्कमउल्हासनगर महापालिका ३१ कोटी ९८ लाख ११ हजार ९६९भिवंडी महापालिका ४५ कोटी ५९ हजार ७६३मीरा-भार्इंदर महापालिका ५२ कोटी २९ लाख ९६ हजार ३५०बदलापूर नगर परिषद ११ कोटी ६३ लाख ११ हजार ४५८अंबरनाथ नगर परिषद १६ कोटी ६३ लाख ७३ हजार ३९६शहापूर नगरपंचायत ८४ लाख ९८ हजार ५२२मुरबाड नगरपंचायत एक कोटी ५० लाख ८२ हजार २१३जव्हार नगर परिषद ८२ लाख ४० हजार २७३डहाणू नगर परिषद तीन कोटी ५१ लाख पाच हजार ३९३पालघर नगर परिषद पाच कोटी ५८ लाख सात हजार १०१विक्रमगड नगरपंचायत ७५ लाख ९० हजार ६६तलासरी नगरपंचायत एक कोटी ५७ लाख ८३ हजार ६२वाडा नगरपंचायत एक कोटी २६ लाख ३७ हजार ५७२मोखाडा नगरपंचायत एक कोटी सात लाख ७८ हजार ३२एकूण १७४ कोटी ५० लाख ८५ हजार १७०
ठाणे-पालघरच्या स्थानिक स्वराज्य संस्था मालामाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 12:36 AM