ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक दोन बाहेरील रेल्वेचे वातानुकूलित शौचालयाला (डिलक्स टॉयलेट) सध्या टाळे लावल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ठेकेदाराचा ठेका संपल्याने ते बंद ठेवले असून यासंदर्भात अद्याप निविदा प्रक्रिया राबवली गेली नाही. त्यामुळे ते किती दिवस बंद राहील हे निश्चित सांगता येत नाही. ठेकेदार मिळाल्यानंतर ते सुरू होईल, असा रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
तीन वर्षांपूर्वी बांधलेला नवीन एफओबी, रंगसंगतीचे शेड, सरकत्या जिन्याबरोबर वातानुकूलित टॉयलेटमुळे एखाद्या आंतरराष्ट्रीय स्थानकाप्रमाणे ठाणे स्थानाकाचे रूपडे बदलले आहे. काही वर्षांमध्ये स्थानकात प्रवाशांची गर्दीही वाढत असून सध्या तब्बल सात-आठ लाखांच्या घरात प्रवाशांची वर्दळ असल्याने रेल्वेकडून सुविधा जितक्या जास्त मिळतील, तेवढेच स्थानकाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. त्यातच, संजीव नाईक हे खासदार असताना त्यांच्या कार्यकाळात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांपैकी रेल्वे स्थानकात वातानुकूलित टॉयलेट सुरू करण्याचा पहिला मान ठाण्याला मिळाला आहे. ते रेल्वेकडून ठेका पद्धतीने दिले जाते. त्यानुसार सद्यस्थितीत ठेका संपल्याने फलाट क्रमांक दोनबाहेर रेल्वेचे वातानुकूलित टायलेट बंद ठेवल्यामुळे आता पुरुषांबरोबर महिला प्रवाशांच्या गैरसोयीला सुरुवात झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.ठाणे रेल्वे स्थानकातील गर्दीप्रमाणे शौचालयांची संख्या कमी स्थानकामध्ये प्रवाशांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामध्ये फलाट क्र मांक २ आणि १० वर मिळून अवघी तीन शौचालये आहेत. तर फलाट क्र मांक २ च्या बाहेर वातानुकूलित शौचालय आहे. तेच सद्यस्थितीत बंद झाले आहे. यामुळे स्थानकातील प्रवाशांची गैरसोय होत आहे.
हे केले असते तर त्रास कमी झाला असतारेल्वेने ठेका संपण्यापूर्वीच त्याची नव्याने निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे होते. मात्र, ती रेल्वे प्रशासनाने का राबवली नाही, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. त्याचबरोबर रेल्वेने ते चालू शौचालय ताब्यात घेऊन त्याठिकाणी खाजगी व्यक्ती ठेवून ते टॉयलेट सुरू ठेवणे अपेक्षित होते.त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नामधून त्या खाजगी व्यक्तींच्या पगाराची व्यवस्था करायला पाहिजे होती. ठेकेदार मिळेपर्यंत तरी ते उत्पन्न बंद झाले नसते. त्यामुळे लवकराच लवकर टायलेट सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.यासंदर्भात रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयाने ठेका संपल्याने ते टायलेट बंद ठेवले आहे. लवकरच त्याची निविदा काढून नवीन ठेकेदार नेमल्यावर ते सुरू होईल. तोपर्यंत प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.