मीरा रोड : मीरा-भाईंदरमध्ये आपल्या गावी जाऊ इच्छिणाऱ्यांनी डॉक्टरांचा दाखला मिळवण्यासाठी, तर दारूची दुकाने सुरू होणार म्हणून मद्यपींनी सोमवारी रांगा लावल्या होत्या. मात्र, दवाखाने आणि दारूच्या दुकानांमध्ये झालेली ही गर्दी आवरताना पोलिसांची दमछाक झाली. कोरोनाच्या भीतीमुळे दवाखाने बंद ठेवणाºया डॉक्टरांनी वैद्यकीय दाखले देण्यासाठी दवाखाने उघडून एका दाखल्यासाठी किमान २०० रुपयांची वसुली सुरू केली आहे.
मीरा-भाईंदरमधील स्टील-बफिंग, मासेमारी, विविध उद्योग, बांधकाम आदी क्षेत्रांतील काही हजार कामगार, मजुरांना आपल्या मूळ गावी जाण्याची ओढ लागली आहे. भिवंडी, वसई येथून परराज्यात जाण्यासाठी विशेष ट्रेन सुटल्याने मीरा-भार्इंदरमधील मजूर, कामगारांनाही आपल्या राज्यात जाण्याची घाई झाली आहे. एका दाखल्यासाठी किमान २०० रुपये आकारून केवळ शरीराचे तापमान तपासून हे दाखलेवाटप सुरू होते. अर्जासोबत डॉक्टरचा दाखला आवश्यक असल्याने सोमवारी सकाळपासून पालिकेची रुग्णालये, आरोग्य केंद्र तसेच खाजगी दवाखान्यांमध्ये लोकांनी गर्दी केली. मुला-बाळांना घेऊन लांबलचक रांगा लावल्या होत्या. उन्हात लोक दाखल्यासाठी ताटकळले होते.‘त्या’ राज्यांचा लोकांना घेण्यास नकारपरराज्यात जाण्यासाठी दाखले मिळवण्यासाठी लोक डॉक्टरांकडे गर्दी करत आहेत. पण, उत्तर प्रदेश, कर्नाटक व हरियाणाने मात्र त्यांच्याच राज्याच्या लोकांना घेण्यास नकार दिल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. कोरोनाची चाचणी करून, १४ दिवस त्यांचे विलगीकरण करा. मगच प्रवेश देऊ, अशी भूमिका या राज्यांनी घेतली आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व अन्य राज्यांमध्ये परवानगी दिली जात आहे.दारू दुकाने उघडण्याचे प्रयत्न फोलशहरातील दारूची दुकाने खुली होणार या आशेने तळीरामांनी मोठी गर्दी केली होती. पण, पोलिसांनी सर्वांना हुसकावून लावले. त्यामुळे दारूसाठी आलेल्या तळीरामांचा हिरमोड झाला. पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांचा १९ एप्रिलचा आदेश दाखवून मीरा-भार्इंदर हे कोरोनाबाधित क्षेत्र जाहीर झाल्याने दारू दुकाने सुरू करता येणार नाहीत, असे स्पष्ट करून दुकाने उघडल्यास गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली.