कल्याण : मतदानाचा दिवस जवळ येऊ लागल्याने सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. घरोघरी भेटी, रॅली, चौकाचौकांमध्ये छोटेखानी सभा, यातून प्रचाराची रंगत वाढत आहे. शिवसेनेने प्रचारासाठी सोशल मिडीयाचाही प्रभावीपणे वापर सुरू केला आहे. त्यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटर आणि इन्स्टाग्रामवर भर दिला आहे.सोशल मीडियाचा प्रभावी वापर पहिल्यांदा २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत झाला होता. त्यामुळे सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही उमेदवार आणि राजकीय पक्षांनी त्याला प्राधान्य दिले आहे. कल्याण मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार आहे. शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, अशी प्रमुख लढत येथे होणार आहे. छोटेखानी सभा आणि प्रचार रॅलीतून मतदारसंघ पिंजून काढत असताना सेनेने सोशल मीडियाद्वारे प्रचारासाठी कार्यकर्त्यांची स्वतंत्र टीम नेमली आहे.कशी चालते यंत्रणा?प्रचार रॅली तसेच चौकसभा या धामधुमीतही दिवसभरात कोणत्या पोस्ट व्हायरल करायच्या, याचे नियोजन करण्यात येते.च्पोस्टमध्ये प्रामुख्याने शिंदे यांचा प्रचार दौरा व रॅली, सभांचे वेळापत्रक प्राधान्याने दिले जाते. फेसबुक, टिष्ट्वटरवरही विक ासकामांच्या पोस्ट टाकल्या जात आहेत. शिंदे यांची प्रचार रॅली सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी फेसबुक लाइव्हचा आधार घेतला जात आहे. अंतिम टप्प्यात होणाऱ्या मोठ्या सभाही फेसबुक लाइव्ह केल्या जाणार आहेत.यू-ट्युब, फेसबुक, ट्विटर हीच हत्यारेसेनेची सोशल मिडीया टीम शॉर्टफिल्म तसेच यू-ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप आदी फ्लॅटफॉर्मवर प्रचाराच्या पोस्ट टाकत आहे. शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांना त्यावर प्राधान्य दिले जात आहे. डोंबिवली पूर्वेतील सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रमुख वॉररूम उघडली आहे.
शिवसेनेकडून सोशल मिडियाचा प्रभावी वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 10:56 PM