ठाणे : तळागाळातील लोकांमधील गुण हेरून लोकमत वृत्तपत्रसमूह त्यांना एक प्रकारे आकार देण्याचे काम विविध माध्यमांतून करत आहे. हे क ाम कौतुकास्पद आहे. रिक्षा चालवणाऱ्या सर्वसामान्य महिलांना पत्रकाराचा दर्जा देणाºया लोकमतचा हा उपक्रम देशातील पहिलाच असावा, असे गौरवोद्गार ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी काढले.लोकमतच्या माध्यमातून ठाण्यातील आॅटो सिटीझन रिपोर्टर्स या उपक्रमांतर्गत ६० महिलापुरुष रिक्षाचालकांना लोकमत रिपोर्टर्स म्हणून ओळखपत्रांचे वाटप खासदार विचारे यांच्या हस्ते, तर ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी उपवन तलाव येथील पालायदेवी मंदिराच्या परिसरात पार पडले. यावेळी ठाणे आरटीओचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक, स्थानिक नगरसेवक नरेंद्र सुरकर, लोकमत समूहाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला, वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान, वितरण व्यवस्थापक (मुंबई) विराज काळसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.सामान्य रिक्षाचालकांना पत्रकारितेत सामावून घेतल्याने प्रत्येक घडामोडीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी यावेळी केले. महिला रिक्षा चालवताना पाहिल्या की, अभिमान वाटतो. रात्रीच्या वेळी त्या दुसºयांना सुरक्षित पोहोचवतात; मात्र त्यांच्या संरक्षणाचे काय? त्यामुळे त्यांना आत्मसंरक्षणाचे धडेही दिले पाहिजे. यासाठी महापालिकेमार्फत पुढाकार घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. रिक्षाचालकांच्या माध्यमातून चांगल्या बातम्या वाचायला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त करून महापौरांनी लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकि शोर नाईक यावेळी म्हणाले की, महिलांनी आता फक्त रिक्षा न चालवता, आपला तिसरा डोळा उघडा ठेवून चांगल्यावाईट घटना टिपाव्यात.यावेळी स्थानिक नगरसेवक नरेंद्र सुरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. लोकमतने सुरक्षेचे कवच दिले आहे. आता आम्ही घाबरणार नाही, असे मत रिक्षाचालक अनामिका भालेराव यांनी सर्व महिला रिक्षाचालकांच्या वतीने व्यक्त केले. कार्यक्रमाची प्रस्तावना वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी, तर सूत्रसंचालन उपसंपादक अनिकेत घमंडी यांनी केले.
लोकमत आॅटो सिटीझन रिपोर्टर्स : रिक्षाचालक महिलांना पत्रकाराचा दर्जा देणारा पहिलाच उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 2:48 AM