शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

लोकमत इम्पॅक्ट : कुष्ठरुग्णसेविकेची अखेर ‘ड्रेसर’पदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:48 PM

केडीएमसीकडून ठरावाची अंमलबजावणी

कल्याण : पूर्वेकडील कचोरे परिसरातील हनुमाननगर कु ष्ठरुग्ण वसाहतीमधील कुष्ठरुग्णांना सात वर्षे मलमपट्टी करणाऱ्या स्मिता भोसले यांना अनुदान मिळावे, याकरिता जानेवारीत केडीएमसीने ठराव मंजूर केला होता. परंतु, त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने २३ मे रोजीच्या ‘हॅलो ठाणे’मध्ये वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत केडीएमसी प्रशासनाने त्या ठरावाची अंमलबजावणी करत भोसले यांची ड्रेसरपदी नियुक्ती केली आहे.

दिव्यांगांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. अशा ५९ कुष्ठरुग्णांना दररोज मलमपट्टी करावी लागते. अन्यथा, रुग्णांच्या जखमांमधून बाहेर पडणाºया जंतंूमुळे रोगाचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे या रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रुग्णांना रोगमुक्त करण्यासाठी झटणाºया दोन सेविकांपैकी स्मिता भोसले या सेविका न्यायाच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांना अनुदान देण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारचीदेखील मान्यता होती. मात्र, त्यांना ठरावाद्वारे केडीएमसीकडून १६ हजार ६०५ रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते. पण, भोसले यांना अनुदान अदा करण्यात आलेले नव्हते. जानेवारीत ठराव मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर ते चुकीचे आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी, अन्यथा उपोषणाशिवाय पर्याय नाही, अशी भूमिका कुष्ठमित्र गजानन माने यांनी घेतली होती. भोसले यांना न्याय मिळावा, म्हणून त्यांचा लढा सात वर्षे सुरू होता. अखेर, त्या लढ्याला यश आले असून माने आणि भोसले यांनी ‘लोकमत’चेही आभार मानले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद धाट यांच्या वतीने गुरुवारी भोसले यांना ड्रेसर म्हणून नियुक्तीपत्र अदा करण्यात आले. यावेळी माने, हनुमाननगर कुष्ठपीडित संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गायकवाड, केडीएमसीचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजू लवंगारे आणि समाजविकास अधिकारी प्रशांत गवाणकर उपस्थित होते.

‘ते’ अनुदानही लवकरच मिळणारहनुमाननगर वसाहतीत कुष्ठरुग्णांची १६० कुटुंबे आहेत. यातील काही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर, सद्य:स्थितीला येथील १०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ५९ रुग्णांच्या दिव्यांगांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक आहे. अशा रुग्णांना केडीएमसीकडून प्रतिमहा अडीच हजार रुपये अनुदान दिले जाते. परंतु, सात महिन्यांपासून केडीएमसीला अनुदान द्यायला विसर पडला आहे, याकडेही ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्यावर तत्काळ अनुदान अदा करण्याचा निर्णय सामान्य प्रशासनाने घेतला असून यासंदर्भातली फाइल लेखा विभागाला पाठवण्यात आली आहे.